Lokmat Agro >बाजारहाट > Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर?

Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर?

Peru Bajar Bhav : 228 quintals of Peru arrived in Solapur Market Committee; How did you get the price? | Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर?

Peru Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीमध्ये २२८ क्विंटल पेरुची आवक; कसा मिळाला दर?

peru bajar bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २२८ क्विंटल पेरुची आवक झाली.

peru bajar bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २२८ क्विंटल पेरुची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी २२८ क्विंटल पेरुची आवक झाली. सरासरी दर २१०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. चांगल्या दर्जाच्या मालाला ४५०० रुपये दर होता.

गेल्या पाच-सहा वर्षांपासून पेरू पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी छत्तीसगड येथून व्ही. एन. आर, गुजरात येथून गुजरात रेड, तर राज्यातील स्थानिक नर्सरीमधून तैवान पिंक जातीच्या पेरूची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे.

या पिकासाठी द्राक्ष व डाळिंब यांच्या तुलनेत किटकनाशक औषध यांचा खर्च कमी असला, तरी याच्या प्रत्येक फळाला क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅग वापरावी लागत असल्याने याचा व मजुरीचा खर्च मोठा आहे.

मागील काही दिवसांपासून पेरुची आवक वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला भागातून पेरु येत आहेत.

याशिवाय कर्नाटकातील काही जिल्ह्यातून माल सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. येणाऱ्या काळात आवक वाढण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी 'ह्या' योजनेतून २५ हजार कोटींची तरतूद; लाभाचे पैसे थेट खात्यात जमा होणार

Web Title: Peru Bajar Bhav : 228 quintals of Peru arrived in Solapur Market Committee; How did you get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.