Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > खरीपातील धानाचे थकीत चुकारे त्वरित द्या! शेतकऱ्यांची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन

खरीपातील धानाचे थकीत चुकारे त्वरित द्या! शेतकऱ्यांची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन

Pay the outstanding dues of kharif paddy immediately! Farmers demand; Representation to the Guardian Minister | खरीपातील धानाचे थकीत चुकारे त्वरित द्या! शेतकऱ्यांची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन

खरीपातील धानाचे थकीत चुकारे त्वरित द्या! शेतकऱ्यांची मागणी; पालकमंत्र्यांना निवेदन

खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे.

शासनाने त्वरित चुकारे अदा करावे अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २०) पालकमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून केली.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ ही राज्य शासनाची धान खरेदी करण्यासाठीची मुख्य अभिकर्ता संस्था असून महामंडळाच्या उपअभिकरता संस्था म्हणून आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष धान खरेदी करते. धान विक्री करून जवळपास दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यात आले नाही.

परिणामी शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा होत असल्याने विक्री केलेल्या धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावे. तसेच खरेदी केलेल्या धानाची वेळेवर उचल होत नसल्याने तुटीचे प्रमाण वाढले असून संस्थांना भुर्दंड सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सन २००१ ते २०१५ पर्यंतचे कमिशन देण्यात यावे, लेबर मंडी चार्ज शासनाकडून सन २०१३-१४ पासून देण्यात येत आहे. परंतु महामंडळाकडून संस्थांना देण्यात आलेला नाही, तो देण्यात यावा गोदामाचे भाडे व कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्या यावेळी दिलेल्या निवेदनात केल्या.

हेही वाचा : भरपूर खनिजे असलेला काटे विरहित निवडुंग ठरतोय गुरांच्या चाऱ्यासाठी फायद्याचा पर्याय; वाचा सविस्तर

Web Title : धान की बकाया राशि का तुरंत भुगतान करें: किसानों की मांग; पालकमंत्री को निवेदन

Web Summary : गोंदिया के किसानों ने धान खरीद केंद्रों पर बेचे गए धान का तुरंत भुगतान करने की मांग की है। देरी के कारण आर्थिक संकट आया है। उन्होंने पालकमंत्री से कमीशन भुगतान, श्रम शुल्क और गोदाम किराया बढ़ाने का भी अनुरोध किया।

Web Title : Farmers Demand Immediate Payment for Paddy Harvest; Appeal to Guardian Minister.

Web Summary : Gondia farmers demand immediate payment for paddy sold at procurement centers. Delays have caused financial distress. They also requested commission payments, labor charges, and increased warehouse rent to the Guardian Minister.