Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > नागपूरच्या तोडीस तोड करंजीची संत्री, व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी; वाचा कसा मिळतोय दर?

नागपूरच्या तोडीस तोड करंजीची संत्री, व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी; वाचा कसा मिळतोय दर?

Oranges from Karanji is popular as like Nagpur, bought on the spot from traders; Read how to get the price? | नागपूरच्या तोडीस तोड करंजीची संत्री, व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी; वाचा कसा मिळतोय दर?

नागपूरच्या तोडीस तोड करंजीची संत्री, व्यापाऱ्यांकडून जागेवर खरेदी; वाचा कसा मिळतोय दर?

दिवसभर परिसरात फिरून परिसरातील बागांची खरेदी करून हे व्यापारी माल या ठिकाणी जमा करून आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेशातील शहरात संत्री पाठवतात.

दिवसभर परिसरात फिरून परिसरातील बागांची खरेदी करून हे व्यापारी माल या ठिकाणी जमा करून आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेशातील शहरात संत्री पाठवतात.

अशोक मोरे
करंजी संत्री म्हटले की नागपूरची आठवण येते. मात्र, आता नागपूरच्या तोडीची संत्री करंजी परिसरात तयार होत असून, राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून व्यापारी येथील संत्री खरेदी करण्यासाठी ठाण मांडून बसले आहेत.

त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या संत्र्याला भावही चांगला मिळत आहे. पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील करंजीसह साततड, देवराई, घाटसिरस, दगडवाडी, भोसे, वैजुबाभूळगावसह अनेक गावात संत्र्यांच्या फळबागा असल्याने या भागाला संत्र्यांचे आगार' म्हणून ओळखले जाते.

पूर्वी नागपूरची संत्री प्रसिद्ध होती. पण, आज नागपूरच्या संत्र्यांच्या तोडीची संत्री करंजी परिसरात तयार होत असून, अनेक व्यापारी या ठिकाणी थांबून संत्री जागेवर खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना आपला माल पुणे-मुंबईला नेण्याची गरज राहिली नाही.

करंजीपासून तिसगावपर्यंत या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर जागा भाड्याने घेतल्या आहेत. दिवसभर परिसरात फिरून परिसरातील बागांची खरेदी करून हे व्यापारी माल या ठिकाणी जमा करून आंध्र प्रदेश, केरळ, मध्य प्रदेशातील शहरात संत्री पाठवतात.

या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी आल्याने शेतकऱ्यांच्या संत्र्याला ५५ ते ६० रुपये किलोप्रमाणे भाव मिळत असल्याचे समजते.

करंजी परिसरातील संत्र्यांची गोडी व रंग नागपूरच्या संत्र्याच्या तोडीचा आहे. या भागात मोठ्या प्रमाणात फळबागा असल्याने आम्ही या भागातील शेतकऱ्यांचा संत्रा जागेवरच खरेदी करतो, यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतो. - महंमद शाहिद, संत्री व्यापारी

पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील विशेषतः करंजी परिसरातील शेती ही फळबागांसाठी अतिशय उत्तम असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात संत्र्यांच्या बागा आहेत. अनेक शेतकरी कृषी विभागाचा सल्ला घेत असल्याने या भागात संत्र्यांच्या फळबागा भरपूर आहेत. - महादेव लोंढे, तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी

अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यात 'या' २३ कारखान्यांनी अखेर जाहीर केला ३ हजार व त्यापेक्षा अधिक ऊस दर

Web Title : करंजी के संतरे नागपुर को टक्कर, व्यापारी मौके पर खरीद रहे: कीमतें खुलीं

Web Summary : करंजी के संतरे अब गुणवत्ता में नागपुर को टक्कर दे रहे हैं। व्यापारी सीधे किसानों से खरीद रहे हैं, जिससे दूर के बाजारों में परिवहन की आवश्यकता नहीं है। किसानों को ₹55-60 प्रति किलो मिल रहा है।

Web Title : Karandi Oranges Rival Nagpur's, Traders Buy On-Site: Prices Revealed

Web Summary : Karandi's oranges now compete with Nagpur's in quality. Traders are buying directly from farmers in Karandi, eliminating the need to transport produce to distant markets. Farmers are getting ₹55-60 per kg.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.