Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आधारभूत दरानुसार भरडधान्य खरेदी; शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत नोंदणीची संधी, पहा खरेदी केंद्राची यादी 

आधारभूत दरानुसार भरडधान्य खरेदी; शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत नोंदणीची संधी, पहा खरेदी केंद्राची यादी 

Latest News Procurement of coarse grains at support price; register by May 15, see the list of procurement centers | आधारभूत दरानुसार भरडधान्य खरेदी; शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत नोंदणीची संधी, पहा खरेदी केंद्राची यादी 

आधारभूत दरानुसार भरडधान्य खरेदी; शेतकऱ्यांना 15 मेपर्यंत नोंदणीची संधी, पहा खरेदी केंद्राची यादी 

Bharaddhanya Kharedi : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आधार प्रमाणीकरण नोंदणीसाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

Bharaddhanya Kharedi : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आधार प्रमाणीकरण नोंदणीसाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई  कार्यालयामार्फत हंगाम 2025-2026 साठी राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार भरडधान्य ( ज्वारी, मका, बाजरी, रागी)  खरेदी करण्यात येणार आहे. 

खरेदीकरीता BeAM पोर्टलवर केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आधार प्रमाणीकरण नोंदणीसाठी 15 मे 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर विहित मुदतीत नोंदणी करुन आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अति.प्र. जिल्हा पणन अधिकारी आर. एस. इंगळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

खरेदी प्रक्रिया 1 मे ते 30 जून 2026 या कालावधीत होणार आहे. रब्बी हंगाम 2025-26 मधील ज्वारी, मका, बाजरी व रागी चा पिकपेरा नमुद असलेला 7/12 उताऱ्याची मूळ प्रत, आधारकार्ड छायांकीत प्रत, बँक खाते (राष्ट्रीयकृत) पासबुकच्या प्रथम पानाची छायांकीत प्रतीसह तालुक्यातील खरेदी केद्रांवर ऑनलाईन नोंदणी करावी. त्यासाठी पणन महासंघाने 19 खरेदी केंद्र मंजूर केलेले आहेत.

असे आहेत तालुकानिहाय मंजूर खरेदी केंद्र व संपर्क क्रमांक

  • 1.येवला -  येवला तालुका सह. खरेदी विक्री संघ
  • 2.मालेगाव - शेतकरी सह. संघ,लि.मालेगाव. 
  • 3.देवळा - देवळा ता.सह.ख.वि.संघ लि.
  • 4.निफाड - कृषीसाधना म.फळे व भाजी. सह. संस्था लि.
  • 5.सिन्नर - सिन्नर तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. सिन्नर
  • 6.चांदवड - चांदवड ता.सह खरेदी विक्री संघ, चांदवड
  • 7.सटाणा - सटाणा (द) भाग वि.का.सह.सोसा.मर्या.सटाणा
  • 8.नामपूर बृ. - विविध कार्यकारी सोसा.मर्या.नामपूर 
  • 9. शनैश्वर नांदगाव ता.सह.ख.वि.संघ लि.नांदगाव
  • 10. चांदवड तालुका - बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था लि रायपूर
  • 11. आश्रय मार्केटिंग ॲण्ड प्रोसेसिंग को-ऑप सोसा. लि. खडकमाळेगाव
  • 12. सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे वि.कार्य सेवा अंदरसुल, येवला
  • 13. अंजनी मेंढपाळ सहकारी संस्था मर्या, साकुरीझाप, ता.मालेगाव
  • 14. आलियाबाद आदिवासी विविध कार्य सह.संस्था मर्या.अलियाबाद, ता. बागलाण
  • 15. वीरगाव विविध कार्य. सह. (विकास) सेवा संस्था मर्या, वीरगाव, ता.बागलाण
  • 16. खामलोण विविध कार्य. सह. संस्था. खामलोण, ता.बागलाण
  • 17. स्व.मोठाभाऊ अहिरे बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, मर्या, झोडगे, मालेगाव
  • 18. कृषीरत्न शेतकरी उत्पादक सहाकारी संस्था पाटणे फाटा, मालेगाव
  • 19. धोडंबा वि.का. सेवा सह. सोसा.लि, वडाळीभोई

शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस.एम.एस. द्वारे माल घेवून येण्याचा दिनांक  कळविला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी, मका, बाजरी व रागी ची विक्री करावयाची आहे. त्या शेतकऱ्यांनी स्वत: नोदंणीच्या ठिकाणी उपस्थित राहवे. नोंदणी व खरेदीसाठी आपआपल्या तालुक्यातील संबंधीत भरडधान्य खरेदी केंद्रावर संपर्क साधावा, असेही अति.प्र. जिल्हा पणन अधिकारी इंगळे यांनी कळविले आहे.

 

Soyabean Market : सोयाबीनच्या दराची MSP च्या दिशेने वाढ, चालू मे महिन्यात क्विंटलमागे किती रुपये मिळतील!

 

Web Title : आधार दर पर अनाज खरीद; 15 मई तक पंजीकरण का मौका।

Web Summary : किसान 15 मई तक आधार दर पर अनाज (ज्वार, मक्का, बाजरा, रागी) खरीद के लिए पंजीकरण करा सकते हैं। पंजीकरण BeAM पोर्टल के माध्यम से ऑनलाइन है। खरीद मई-जून 2026 में होगी। पंजीकरण के लिए आवश्यक दस्तावेजों के साथ स्थानीय खरीद केंद्रों से संपर्क करें।

Web Title : Register by May 15 for Grain Purchase at Base Rate.

Web Summary : Farmers can register until May 15 for government-supported grain purchases (Jowar, Maize, Bajra, Ragi) at base rates. Registration is online via the BeAM portal. Purchases occur May-June 2026. Contact local purchase centers with required documents for registration.