Soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमतीत MSP च्या दिशेने वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. चालू मे महिन्यात हे दर कसे राहतील, हे पाहुयात....
मागील दोन वर्षातील मे महिन्यातील सरासरी किंमती खालील प्रमाणे होत्या :
मे २०२३ मध्ये ५ हजार ३६ रुपये प्रति क्विंटल
मे २०२४ मध्ये ४ हजार ५६८ रुपये प्रति क्विंटल
तर चालू महिन्याच्या मे २०२६ मध्ये ५ हजार ५०० ते ५ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार दर मिळतो आहे. मात्र सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याचे चित्र आहे.
भारताच्या सोयामील निर्यातीत सन २०२४-२५ या वर्षात मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. तसेच, सन २०२४-२५ साठीच्या अंदाजानुसार निर्यातीत आणखी घट होण्याची शक्यता असून.
निर्यातीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत कमी राहण्याची अपेक्षा आहे. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १०५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून मे २०२६ या कालावधीसाठी सोयाबीन पिकाच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
