Kanda Market : आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०१ लाख ४० हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये लासलगाव बाजारात कमीत कमी ४५१ रुपये तर सरासरी १४३५ रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४६० रुपये दर मिळाला.
तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, नागपूर बाजार सरासरी १६०० रुपये, देवळा बाजारात केवळ सातशे रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १२०० रुपये, मंगळवेढा बाजारात १ हजार रुपये असा दर मिळाला.
दुसरीकडे सोलापूर बाजारात पांढऱ्या कांद्याची आवक झाली. या ठिकाणी १३०० रुपये तर नागपूर बाजारात २३७५ रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १३५० रुपये दर मिळाला.
वाचा आजचे बाजारभाव
