Kanda Market : कांदा मार्केट अतिशय चिंताजनक स्थितीत असून कांद्याला प्रति किलो एक ते दोन रुपये असा दर मिळतो आहे. आज १२ मे रोजी लासलगाव मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला.
नाशिक मार्केटला कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, अकोले मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १०११ रुपये, संगमनेर मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ७८८ रुपये तर पिंपळगाव मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ११५० रुपये असा दर मिळाला.
तसेच भुसावळ मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ८०० रुपये, रामटेक मार्केटमध्ये सरासरी १२०० रुपये देवळा मार्केटमध्ये ११५० रुपये, तर उमराणे मार्केटमध्ये ११०० रुपये असा दर उन्हाळा कांद्याला मिळाला.
तसेच लाल कांद्याला सोलापूर मार्केट मध्ये कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ६०० रुपये, धुळे मार्केटमध्ये ६८० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १२५० रुपये तर अमरावती भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी ०१ हजार ५० रुपये, पुणे पिंपरी मार्केटमध्ये एक हजार रुपये दर मिळाला.
