Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : लाल कांदा विकायचा का ठेवायचा, मार्च एण्डपर्यंत कांदा दर काय राहतील?

Kanda Bajar Bhav : लाल कांदा विकायचा का ठेवायचा, मार्च एण्डपर्यंत कांदा दर काय राहतील?

Latest News Kanda Bazaar Bhav What will be the onion prices till the end of March 2026 | Kanda Bajar Bhav : लाल कांदा विकायचा का ठेवायचा, मार्च एण्डपर्यंत कांदा दर काय राहतील?

Kanda Bajar Bhav : लाल कांदा विकायचा का ठेवायचा, मार्च एण्डपर्यंत कांदा दर काय राहतील?

Kanda Bajar Bhav : येणाऱ्या काळात लाल कांद्याचे दर कसे राहतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. 

Kanda Bajar Bhav : येणाऱ्या काळात लाल कांद्याचे दर कसे राहतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. 

Kanda Bajar Bhav : मागील दोन आठवड्यापासून लाल कांदा दरात कमालीची घसरण झाली आहे. त्यात अद्यापही सुधारणा झाली नसल्याचे चित्र आहे. होळीनंतर या दरांमध्ये किंचितशी सुधारणा झाली. त्यामुळे येणाऱ्या काळात लाल कांद्याचे दर कसे राहतील, हा महत्वाचा प्रश्न आहे. 

तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या जिल्ह्यात दर टिकून राहतील. तर नगर, नाशिक जिल्ह्यात परिस्थिती जैसे थे राहणार असल्याची चिन्हे आहेत. म्हणजे दरात तेवढ्याच प्रमाणात चढ उतार सुरु राहील. म्हणजे कांदा दर अस्थिर राहतील, अशी शक्यता आहे. 

सध्या ऊन वाढते आहे. त्यामुळे कांदा क्वालिटी कमी होत चालल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीचा आढावा घेणे कधीही चांगले. म्हणजेच कांदा किती काळ ठेवावा, हे लक्षात येईल. शिवाय लाल कांदा जास्त दिवस ठेवणेही चांगले नाही. मात्र कांदा विकायचा का नाही, हा निर्णय शेतकऱ्यांवर आहे. 

आजचे दर काय आहेत? 

सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये, सरासरी ८०० रुपये, लासलगाव मार्केटमध्ये ४०० रुपये ते ९०० रुपये,  अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये सरासरी ७५० रुपये, नागपूर मार्केटमध्ये १२०० रुपये, देवळा मार्केटमध्ये ८५० रुपये, तर कळवण मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी ११०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये पोळ कांद्याला ९०० रुपये दर मिळाला.

Web Title: Latest News Kanda Bazaar Bhav What will be the onion prices till the end of March 2026