Kanda Bajarbhav : मागील महिनाभरापासून कांदा दरातील घसरणीमुळे (Kanda Market Down) शेतकऱ्यांचा अर्थकारण कोलमडला आहे दुसरीकडे बांगलादेश ने घेतलेला निर्णय आणि कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी भारत सरकारचे धोरण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. मागील सात दिवसांचे कांदा बाजार भाव पाहिले असता बाजारभावात दिलासा दिसू लागला आहे.
राज्यातील लासलगाव आणि सोलापूर बाजाराचा (Solapur Kanda Market) आढावा घेतला असता लासलगाव बाजारात १५ जानेवारी रोजी २ हजार रुपये, १६ जानेवारी रोजी १९५० रुपये, १७ जानेवारी रोजी २१५० रुपये, १८ जानेवारी रोजी २१५१ रुपये भाव मिळाला. लासलगाव बाजारात (Lasalgaon Kanda Market) मागील आठवड्यात दरात बदल दिसून येऊ लागला आहे.
दुसरीकडे सोलापूर बाजारात मागील आठवड्यात १५ जानेवारी रोजी १५०० रुपये, १६ जानेवारी रोजी १६०० रुपये, १७ जानेवारी रोजी १८०० रुपये, १८ जानेवारी रोजी १८०० रुपये भाव मिळाला. दरम्यान सोलापूर बाजारात देखील हळूहळू दरात बदल होत आहे. साधारण राज्यातील बाजारात संक्रातीनंतर काहीसा फरक जाणवू लागला आहे. कारण तत्पूर्वी या दोन्ही बाजारात दरात कमालीची घसरण झाली होती. आता काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळण्याची आशा आहे.
आवक कशी राहिली?
जर कांदा आवकेचा विचार केला तर मागील आठवड्यात १५ जानेवारी रोजी १ लाख ६ हजार क्विंटल, १६ जानेवारी रोजी २ लाख ६४ हजार क्विंटल, १७ जानेवारी रोजी ३ लाख क्विंटल, १८ जानेवारी रोजी २ लाख क्विंटल अशी आवक झाली. यानुसार गेल्या आठवड्याच्या तुलनेत मागील आठवड्यात आवक काहीशी मंदावली. मात्र ओघ जैसे थे असल्याचे चित्र आहे.