Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश

Latest News Important decision to prevent disruption in paddy transportation, instructions from Tribal Development Minister | Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ रोखण्यासाठी महत्वाचा निर्णय, आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्र्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे.

Paddy Transportation : धान वाहतुकीत होणारा घोळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्र्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे.

गडचिरोली : धान वाहतुकीत होणारा घोळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्र्यांनी कठोर पवित्रा घेतला आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार आता धान वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनावर १०० टक्के जीपीएस यंत्रणा अनिवार्य असेल. 

जीपीएस नसेल तर वाहतूक नाही, अशा स्पष्ट शब्दांत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी पारदर्शकतेचा मंत्र धान दिला. यामुळे जिल्ह्यात वाहतुकीतील 'अर्थपूर्ण' हालचालींना लगाम लागण्याची शक्यता आहे.

राइस मिल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी आपली गाऱ्हाणी मांडली. केंद्र शासनाला ६७ टक्के तांदूळ अपेक्षित असला तरी प्रत्यक्षात ५२ ते ५४ टक्केच उतारा मिळत असल्याने मिलर्सनी नुकसानीची भीती व्यक्त केली.

वनपट्टाधारकांसाठी मोहीम
जिल्ह्यातील एकही शेतकरी धानविक्रीपासून वंचित राहू नये, यासाठी वनपट्टाधारकांची ऑनलाइन नोंदणी आणि १०० टक्के ई-पीक पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यासाठी मोहीम राबविण्याची सूचना केली.

गोदामाचाही मुद्दा गाजला
यासोबतच हमाली आणि गोदामांच्या कमतरतेचा मुद्दाही गाजला. मंत्र्यांनी यावर संबंधित विभागांनी समन्वय साधून तातडीने तोडगा काढण्याचे निर्देश दिले. बैठकीला आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आदिवासी आयुक्त लीना बनसोड आदी उपस्थित होते.

 

 

 El Nino Effect : एल निनो म्हणजे काय, त्याचा भारतीय मान्सूनवर काय परिणाम होईल, यंदा पाऊस कसा राहील?

 

Web Title : धान परिवहन धोखाधड़ी रोकने के लिए जीपीएस अनिवार्य: मंत्री का आदेश

Web Summary : धान परिवहन में धोखाधड़ी रोकने के लिए सभी वाहनों पर जीपीएस अनिवार्य किया गया है। मंत्री अशोक उइके ने चावल मिल मालिकों की उपज प्रतिशत संबंधी चिंताओं को भी संबोधित किया। एक विशेष अभियान किसानों को ऑनलाइन पंजीकरण और ई-फसल सर्वेक्षण में मदद करेगा, गोदाम और श्रम की कमी से संबंधित मुद्दों का समाधान करेगा।

Web Title : GPS Mandatory to Curb Paddy Transportation Fraud: Minister's Order

Web Summary : To prevent paddy transportation fraud, GPS is now mandatory on all vehicles. Minister Ashok Uike also addressed rice millers' concerns about yield percentages. A special campaign will aid farmers with online registration and e-crop surveys, resolving issues related to warehousing and labor shortages.