lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, सकाळ सत्रातील बाजारभाव काय? 

नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, सकाळ सत्रातील बाजारभाव काय? 

Latest News highest price of red onion in Nagpur market committee, morning market price | नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, सकाळ सत्रातील बाजारभाव काय? 

नागपूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, सकाळ सत्रातील बाजारभाव काय? 

राज्यातील बाजार समित्यामध्ये सकाळ सत्रात काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

राज्यातील बाजार समित्यामध्ये सकाळ सत्रात काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

आज सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यातील बाजार समित्यांमध्ये जवळपास पावणे एक लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती. मागील आठवडाभरापासून कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी नाराज आहेत. जवळपास हजार ते बाराशे रुपये दर लाल आणि उन्हाळ कांद्याला मिळू लागला आहे. आजच्या बाजार अहवालानुसार सकाळ सत्रात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपयांपर्यंत भाव मिळाला. 'तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

आज 18 मार्च रोजी सकाळच्या सत्रात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगली झाली. सकाळ सत्रात पुणे    बाजार समितीत 14 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यांनतर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये देखील 11 हजार क्विंटलपर्यंत आवक झाली. तर सर्वाधिक 7 हजार क्विंटल उन्हाळ कांदा पिंपळगाव बाजार समितीत दाखल झाला. आज सकाळच्या सत्रात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर उन्हाळ कांद्याला 1200 रुपये दर मिळाला. मात्र दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी 1315 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1420 रुपये दर मिळाला. 

नागपूरला सर्वाधिक बाजारभाव 

दुसरीकडे नागपूर बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची 2000 क्विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी 1875 इतका सर्वाधिक भाव मिळाला. तसेच लाल कांद्याला देखील सर्वाधिक 1850 रुपये असा दर मिळाला. कराड बाजार समितीत हालवा कांद्याची आवक झाली, तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत पोळ कांद्याची 2400 क्विंटल आवक झाली.  या ठिकाणी सरासरी 1250 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सकाळ सत्रातील दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/03/2024
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल733140020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11413100015001250
कराडहालवाक्विंटल9950018001800
येवलालालक्विंटल700050114901270
येवला -आंदरसूललालक्विंटल130030013401250
नागपूरलालक्विंटल2200140020001850
कळवणलालक्विंटल100025013651001
चांदवडलालक्विंटल150058114301230
मनमाडलालक्विंटल250027013601100
देवळालालक्विंटल135035013251225
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल396040016001000
पुणेलोकलक्विंटल1493250015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल8425001200850
वाईलोकलक्विंटल50070016001200
कामठीलोकलक्विंटल16150025002000
नागपूरपांढराक्विंटल2000150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल240040013961250
येवलाउन्हाळीक्विंटल100040114211260
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल70030013201250
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल610050014511350
चांदवडउन्हाळीक्विंटल400060015231330
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015801350
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल9135110017201435
देवळाउन्हाळीक्विंटल200050013001225

Web Title: Latest News highest price of red onion in Nagpur market committee, morning market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.