Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

latest news Halad Market: Halad arrivals slow in Hingoli; Market Committee advises 'this' read in details | Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

Halad Market : मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची हळदीची आवक हिंगोली मार्केटयार्डात कमी झाली आहे. लिलाव व मोजमापाचे काम त्याच दिवशी होत असल्याने शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशीच हळद आणावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Halad Market)

Halad Market : मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची हळदीची आवक हिंगोली मार्केटयार्डात कमी झाली आहे. लिलाव व मोजमापाचे काम त्याच दिवशी होत असल्याने शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशीच हळद आणावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे. (Halad Market)

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market : मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांची हळदीची आवक हिंगोली मार्केटयार्डात कमी झाली आहे. लिलाव व मोजमापाचे काम त्याच दिवशी होत असल्याने शेतकऱ्यांनी ठरलेल्या दिवशीच हळद आणावी, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.(Halad Market)

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या चार दिवसांपासून हळदीची आवक लक्षणीयरीत्या मंदावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुक्कामी थांबण्याऐवजी बीटच्या दिवशीच हळद विक्रीसाठी आणावी, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.(Halad Market)

हंगाम संपल्यानंतर आवक कमी

हळदीचा प्रमुख हंगाम संपून जवळपास चार महिने उलटले असून, सध्या दररोज सरासरी एक ते दीड हजार क्विंटल एवढीच आवक होत आहे. पूर्वीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने हळदीच्या लिलाव व मोजमापाचे काम त्याच दिवशी पूर्ण करण्यास समितीला सोपे जात आहे.

विदर्भ-मराठवाड्यातून येते आवक

हिंगोलीतील संत नामदेव मार्केट यार्डात मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी येतात. परंतु मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची उपस्थिती घटली आहे. त्यामुळे मुक्कामी थांबून अनावश्यक वेळ व खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बीटच्या दिवशीच हळद आणावी, असे बाजार समितीने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांना दिलेला सल्ला

बाजार समितीने शेतकऱ्यांना सूचित केल्या या समस्या

* दररोज दाखल होणाऱ्या हळदीचे लिलाव व मोजमाप त्याच दिवशी पूर्ण होत आहेत.

* मुक्कामी थांबल्यास वेळ आणि खर्च वाढतो.

* म्हणूनच शेतकऱ्यांनी ठरलेल्या बीटच्या दिवशीच हळद विक्रीसाठी आणावी.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाचे दर शेतकऱ्यांना रडवणार; सीझन सुरू होण्याआधीच निकाल? वाचा सविस्तर

Web Title: latest news Halad Market: Halad arrivals slow in Hingoli; Market Committee advises 'this' read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.