lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest News 29 april 2024 todays summer onion market price in market yards | Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Onion Market : पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 01 लाख 17 हजार क्विंटल लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 01 लाख 17 हजार क्विंटल लाल आणि उन्हाळ कांद्याची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये 01 लाख 17 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने आवक चांगली झाल्याचे दिसून आले. आजच्या बाजार अहवालांनुसार लाल कांद्याला सरासरी 1050 रुपये ते 1600 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1451 रुपये दर मिळाला. आज कुठे काय भाव मिळाला, हे थोडक्यात पाहुयात.... 

आज 29 एप्रिल 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वाधिक 49 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. त्यानंतर लाल आणि सर्वसाधारण कांद्याची आवक झाली. आज सर्वसाधारण कांद्याला सरासरी 1200 रुपये ते 1500 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण कांद्याला सर्वाधिक दर चंद्रपूर - गंजवड बाजार समितीत मिळाला. तर कराड बाजार समितीत हलवा कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. 

आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याची 11 हजार क्विंटलची आवक झाली. तर या कांद्याला सरासरी 1200 रुपये दर मिळाला. राज्याचा विचार केला तर सरासरी 1050 रुपये ते 1430 रुपये असा दर मिळाला. लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये ते  1500 रुपये दर मिळाला. यानुसार कामठी बाजारात देखील दर घसरल्याचे दिसून आले. 

उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव 

आजच्या बाजार अहवालानुसार येवला बाजारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1200 रुपये, नाशिक बाजारात 1350 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 1400 रुपये, संगमनेर बाजारात 900 रुपये, चांदवड बाजारात 1250 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1451 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

29/04/2024
कोल्हापूर---क्विंटल329560018001200
अकोला---क्विंटल890100015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23183001300800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल462100018501500
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10531110016001350
सातारा---क्विंटल110100015001250
कराडहालवाक्विंटल198100012001200
सोलापूरलालक्विंटल1104610021001200
अमरावती- फळ आणि भाजीपालालालक्विंटल309100022001600
धुळेलालक्विंटल76220012001050
जळगावलालक्विंटल17675001250887
यावललालक्विंटल450124016501430
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल306340018001100
पुणे-मोशीलोकलक्विंटल4605001400950
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल3600110012491200
मंगळवेढालोकलक्विंटल3820015501180
कामठीलोकलक्विंटल20150025001500
कल्याणनं. १क्विंटल38001100900
येवलाउन्हाळीक्विंटल300030012811200
नाशिकउन्हाळीक्विंटल299070014511350
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल890070016301400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल15971001600900
कळवणउन्हाळीक्विंटल1490040018201300
संगमनेरउन्हाळीक्विंटल78552001600900
चांदवडउन्हाळीक्विंटल470052018301250
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1032640019901451
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल363060013531225

Web Title: Latest News 29 april 2024 todays summer onion market price in market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.