lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

Latest News 18 march Todays Onion Market price in nashik and maharashtra | Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

Onion Market : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला काय बाजारभाव मिळाला? आजचे सविस्तर दर 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली, कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात..

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये सर्वाधिक लाल कांद्याची आवक झाली, कुठे काय भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

कांदा बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. एकीकडे गुरुवारी झालेल्या ऑनलाईन लिलावात एनसीईएलने (राष्ट्रीय सहकारी निर्यात लि.) प्रति किलोसाठी २९ रुपये भाव दिला. मात्र त्याच दिवशी कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी केवळ १३ रुपयांचा भाव मिळाला. एकूणच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1325 रुपये दर मिळाला आहे. परवा म्हणजेच शनिवारी याच बाजारसमितीत प्रति क्विंटलला 1491 रुपये दर मिळाला आहे. 

आज 18 मार्च रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मागील आठवडाभरात कांदा बाजारभावात कमालीचा चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात कांदा बाजारभाव कमालीचा घटला आहे. गेल्या आठवड्यात बाजारभाव अठराशे रुपयांपर्यंत होते. मात्र सद्यस्थितीत भाव पूर्ण कोसळले आहेत. आज लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला सरासरी 1325 रुपये दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला 1420 रुपये दर मिळाला आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक 1875 रुपयांचा भाव पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजार समितीत मिळाला. तर कामठी बाजार समितीत लोकल कांद्याला 2000 रुपये दर मिळाला आहे. 

कुठे किती आवक झाली? 

आजच्या दिवसातील सर्वाधिक 27 हजार 436 क्विंटल कांद्याची आवक सोलापूर बाजार समितीत झाली. तर संगमनेर बाजार समितीत  उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 11 हजार 758 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर आज जुन्नर - नारायणगाव, कराड, शेवगाव बाजार समितीत अनुक्रमे चिंचवड, हालवा, नंबर एक, दोन, तीन कांद्याची आवक झाली. आज बारा बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक आवक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये पाहायला मिळाली. 

असे आहेत राज्यातील कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/03/2024
कोल्हापूर---क्विंटल690360018001200
अकोला---क्विंटल111080016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29404001400900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल733140020001600
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल11413100015001250
सातारा---क्विंटल14670015001100
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल1630016001200
कराडहालवाक्विंटल9950018001800
सोलापूरलालक्विंटल2743620018501000
बारामतीलालक्विंटल55430014001000
येवलालालक्विंटल700050114901270
येवला -आंदरसूललालक्विंटल130030013401250
धुळेलालक्विंटल34420021001440
लासलगावलालक्विंटल163260015001325
लासलगाव - निफाडलालक्विंटल38060014011275
लासलगाव - विंचूरलालक्विंटल166450013351250
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल900050015001350
नागपूरलालक्विंटल2200140020001850
नंदूरबारलालक्विंटल651108512451150
सिन्नरलालक्विंटल197620013021150
राहूरी -वांबोरीलालक्विंटल10361001500900
कळवणलालक्विंटल100025013651001
संगमनेरलालक्विंटल13061001400750
चांदवडलालक्विंटल150058114301230
मनमाडलालक्विंटल250027013601100
सटाणालालक्विंटल765020014451150
यावललालक्विंटल66385012501000
देवळालालक्विंटल135035013251225
उमराणेलालक्विंटल850060014001250
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल55860020001300
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल396040016001000
पुणेलोकलक्विंटल1493250015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7140016001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल8425001200850
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल2500110013801250
वाईलोकलक्विंटल50070016001200
मंगळवेढालोकलक्विंटल21010016001400
कामठीलोकलक्विंटल16150025002000
शेवगावनं. १नग730120015001500
शेवगावनं. २नग38690011001100
शेवगावनं. ३नग420200800800
नागपूरपांढराक्विंटल2000150020001875
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल240040013961250
येवलाउन्हाळीक्विंटल100040114211260
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल70030013201250
लासलगावउन्हाळीक्विंटल978480015001420
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल454050014141300
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल609650014611400
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल65950013811275
संगमनेरउन्हाळीक्विंटल117581001611855
चांदवडउन्हाळीक्विंटल400060015231330
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल700030015801350
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल274055013751250
दिंडोरी-वणीउन्हाळीक्विंटल9135110017201435
देवळाउन्हाळीक्विंटल200050013001225
उमराणेउन्हाळीक्विंटल550070014901300

Web Title: Latest News 18 march Todays Onion Market price in nashik and maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.