चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वाटाणा, हिरवी मिरची, गाजर, शेवगा आणि डांगर भोपळ्यांची विक्रमी आवक झाली आहे.
दोडका, कारली, वालवड, लसूण, बटाटा, भेंडी आणि वाटाण्याचे भाव जोरात वाढले आहेत. चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, मेथी व पालक भाजीची मोठी आवक झाल्याने त्यांच्या भावातही चांगली वाढ झाली आहे.
एकूण उलाढाल ५ कोटी ५० लाखांपर्यंत झाली आहे. चाकण बाजारात कांद्याची एकूण २५५० क्विंटल आवक झाली आहे. कांद्याचा कमाल भाव १,५०० वरून २,५०० पर्यंत पोहोचला आहे.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक १०० क्विंटलने वाढली असून, बटाट्याचा कमाल भाव २,००० वर स्थिरावला आहे.
लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली असून, गेल्या शनिवारसारखीच आवक असली तरी भाव १०,००० वर स्थिर राहिले आहेत. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३७० क्विंटल झाली आहे.
शेतीमालाची आवक व बाजारभाव
कांदा
एकूण आवक २,५५० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,५००
भाव क्रमांक २) १,५००
भाव क्रमांक ३) १,०००
बटाटा
एकूण आवक १,५०० क्विंटल
भाव क्रमांक १) २,०००
भाव क्रमांक २) १,५००
भाव क्रमांक ३) १,०००
अधिक वाचा: सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जायची गरज नाही; डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर
