चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये गाजर, हिरवी मिरची, टोमॅटो आणि वाटाण्याचे भाव तेजीत राहिले. आद्रक, वालवड, बटाटा, लसूण आणि काकडीची भरपूर आवक झाली.
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर आणि पालक भाजीची विक्रमी आवक झाल्याने त्यांच्या भावात कोसळ होणारा बाजार पाहायला मिळाला. एकूण उलाढाल ६ कोटी १५ लाख रुपयांपर्यंत झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण ३,५०० क्विंटल आवक झाली. कांद्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून १,८०० रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक निम्म्याने घटली तरीही बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ४० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १० क्विंटलने घटली तरीही भाव १०,००० रुपयांवर स्थिरावले.
हिरव्या मिरचीची एकूण आवक २८० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ४,५०० रुपयांपासून ते ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक
कांदा
एकूण आवक - ३,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) १,८०० रुपये.
भाव क्रमांक २) १,२०० रुपये.
भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
बटाटा
एकूण आवक - २,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,००० रुपये
भाव क्रमांक २) १,५०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?
