चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये लसूण, बटाटा, वांगी व वाटाण्याची विक्रमी आवक झाली.
चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर, मेथी व पालक भाजीची उच्चांकी आवक होऊनही त्यांचे भाव तेजीत राहिले. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण १ हजार ५०० क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही भावात १०० रुपयांची घट झाली.
कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवरून १,३०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,००० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक ७५० क्विंटलने वाढल्याने बटाट्याचा कमाल भाव २,२०० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक ४० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढल्याने लसणाचा कमाल भाव ८,००० रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार ५०० रुपयांपासून ३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कांदा
एकूण आवक - १,५०० क्विंटल.
भाव क्र १) १,३०० रुपये.
भाव क्र २) १,००० रुपये.
भाव क्र ३) ७०० रुपये.
बटाटा
एकूण आवक - २,००० क्विंटल.
भाव क्र १) २,२०० रुपये.
भाव क्र २) १,४०० रुपये.
भाव क्र ३) १,००० रुपये.
अधिक वाचा: महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज
