चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, कारली, हिरवी मिरची आणि बटाट्याची विक्रमी आवक नोंदवली गेली.
पालेभाज्यांची प्रचंड आवक झाल्याने भाज्यांचे भाव कोसळले, तर कांदा आणि बटाट्याचे भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ३ कोटी २० लाख रुपये नोंदवली गेली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० क्विंटलने अधिक आहे. यामुळे कांद्याचा कमाल भाव १,७०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला.
बटाट्याची आवक २,००० क्विंटल नोंदवली गेली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ७५० क्विंटलने वाढली. यामुळे बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला.
लसणाची आवक ३५ क्विंटल राहिली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होती. लसणाचा कमाल भाव १०,००० रुपये प्रति क्विंटलवर कायम राहिला. हिरव्या मिरचीची आवक १०४ क्विंटल होती तिला ३,००० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: राज्यातील जमीन मोजणीची प्रकरणे आता तातडीने निकाली लागणार; आले नवीन १२०० रोव्हर