Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढली; वाचा नं १ कांद्याला काय मिळतोय दर?

चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढली; वाचा नं १ कांद्याला काय मिळतोय दर?

Kanda Market : Onion arrivals at Chakan market have increased compared to last week; Read No. 1 What is the price being obtained? | चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढली; वाचा नं १ कांद्याला काय मिळतोय दर?

चाकण बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांदा आवक वाढली; वाचा नं १ कांद्याला काय मिळतोय दर?

kanda market हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली.

kanda market हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाली. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली.

चाकण खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा, वाटाणा व टोमॅटोची विक्रमी आवक झाली.

हिरवी मिरची, वांगी, चवळी व बटाटा यांचे भाव गडगडले आहेत. कांद्याची प्रचंड आवक झाल्याने भाव कोसळले. चाकण बाजारात पालेभाज्यांचे भाव कडाडले आहेत. एकूण उलाढाल ६ कोटी १० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ९ हजार ५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १ हजार ५०० क्विंटलने वाढल्याने भावात १०० रुपयांची घसरण झाली. कांद्याचा कमाल १,४०० रुपयांवरून १,३०० रुपयांवर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ३०० क्विंटलने घटल्याने भावात शंभर रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,२०० रुपयर्यावरून १,३०० रुपयांवर पोहोचला.

लसणाची एकूण आवक ५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही कमाल भावही १२ हजार रुपयांवर स्थिरावले.

शेतीमाल आवक व बाजारभाव
कांदा

एकूण आवक - ९,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) १,३०० रुपये.
भाव क्रमांक २) १,१०० रुपये.
भाव क्रमांक ३) ८०० रुपये.

बटाटा
एकूण आवक - १,१०० क्विंटल
भाव क्रमांक १) १,३०० रुपये.
भाव क्रमांक २) १,२०० रुपये.
भाव क्रमांक ३) ७०० रुपये.

अधिक वाचा: आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

Web Title: Kanda Market : Onion arrivals at Chakan market have increased compared to last week; Read No. 1 What is the price being obtained?