चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये वांगी, गवार, वाटाणा, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, हिरवी मिरची यांची आवक घटली आहे.
मात्र, येथे पालेभाज्यांच्या बाजारात कोथिंबीर या भाजीची उच्चांकी आवक झाली. एकूण उलाढाल ५ कोटी १० लाख रुपयांची झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण १,५०० क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढली, तरी कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत बटाट्याची आवक १५० क्विंटलने घटली. मात्र, बटाट्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवरून २,२०० रुपयांवर पोहोचला.
लसणाची एकूण आवक ३५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने घटली, तरी लसणाचा कमाल भाव ८,००० रुपयांवर स्थिर राहिला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३९५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
कसे मिळाले दर?
कांदा
एकूण आवक - १,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) १,४०० रुपये.
भाव क्रमांक २) १,२०० रुपये.
भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
बटाटा
एकूण आवक - १,४०० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,२०० रुपये.
भाव क्रमांक २) १,५०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,००० रुपये.
अधिक वाचा: रेशनमध्ये किती व कोणते धान्य मिळणार? हे आता थेट मोबाईलवर एसएमएसद्वारे कळणार
