सोलापूर : येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी ४१० ट्रक कांद्याची आवक झाली. मंगळवारी किमान १००, कमाल २,०००, तर सर्वसाधारण दर ८५० रुपये असा भाव मिळाला.
८२ हजार १०० पिशव्यातील ४१ हजार ५० क्विंटल कांद्यातून बाजार समितीला मंगळवारी ३ लाख ४८ हजार ९२ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.
मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात चढ-उतार होत असून, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.
अधिक वाचा: राज्यात जमीन महसूल सुनावणी प्रकरणांचा जलद निपटारा होणार; आता नोटीस मिळणार ईमेल द्वारे
