Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Kharedi : कांदा उत्पादनात वाढ; व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी

Kanda Kharedi : कांदा उत्पादनात वाढ; व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी

Kanda Kharedi : Increase in onion production; Traders buy onions at rock-bottom prices | Kanda Kharedi : कांदा उत्पादनात वाढ; व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी

Kanda Kharedi : कांदा उत्पादनात वाढ; व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी

कांदा पिकाचा भाव कमी झाल्यामुळे कांदा व्यवस्थापन करून मोठमोठ्या शेडमध्ये कांदा हजारो टन साठवण करून ठेवलेला आहे.

कांदा पिकाचा भाव कमी झाल्यामुळे कांदा व्यवस्थापन करून मोठमोठ्या शेडमध्ये कांदा हजारो टन साठवण करून ठेवलेला आहे.

नीरा नरसिंहपूर : कांदा पिकाचा भाव कमी झाल्यामुळे कांदा व्यवस्थापन करून मोठमोठ्या शेडमध्ये कांदा हजारो टन साठवण करून ठेवलेला आहे.

नीरा नदी व भीमा नदीच्या पट्ट्यात बावडा ते नरसिंहपूर परिसरामध्ये हजारो एकर जमिनीवर कांदा लागवड होती. सर्वच शेतकऱ्यांच्या कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली.

हजारो टन कांदा उत्पादन वाढले. परंतु हमीभाव नसल्यामुळे पिकवलेला माल मातीमोल होऊन कमी किमतीच्या दराने ३ रुपये ते १३ रुपयेपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा व्यापारी खरेदी करीत आहेत.

कांद्याला भाव कमी मिळत असल्यामुळे छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा निवडून चाळीमध्ये साठवण करून ठेवण्यात आलेला आहे.

कांद्याला भाव कमी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. राज्य शासनाने पिकवलेल्या कांद्याला योग्य हमीभाव मिळवून द्यावा. एवढीच कष्टकरी शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतात पेरलेल्या पिकासाठी शेतकरी राजा अडचणीत आलेला आहे. शेतकरी जिवंत राहिला तरच अन्नधान्य, शेतमाल प्रत्येक बाजारपेठेत मिळेल. अन्यथा मिळणार नाही.

म्हणूनच शेतकरी जिवंत ठेवण्यासाठी शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून द्यावा. अशी मागणी नरसिंहपूर, टणु, गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, सराटी, लिंबोडी, गणेशवाडी आदी भागातील सर्व शेतकऱ्यांची आहे.

कांद्याला योग्य दर मिळेपर्यंत कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे. शेतकऱ्यांची मागणी मान्य करूनच शेतमालातील सर्व पिकांचे भाव योग्य जाहीर करावेत अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.

अधिक वाचा: पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Web Title: Kanda Kharedi : Increase in onion production; Traders buy onions at rock-bottom prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.