सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १९१ ट्रक कांद्याची आवक झाली. किमान १००, कमाल २२५०, तर सर्वसाधारण १०५० असा दर प्रतिक्विंटल मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. पुणे, अहिल्यानगर, कर्नाटक राज्यातून लाल व पांढरा कांदा विक्रीसाठी येत आहे.
बाजारात येत असलेला कांदा जुना कांदा असल्याचे व्यापारी सांगतात. गुरुवारी ३६ हजार ३७२ पिशव्या म्हणजेच १८ हजार १८६ क्विंटल कांदा विक्री झाला. यातून बाजार समितीमध्ये १ कोटी ९० लाख ९५ हजार ३०० रुपयांची उलाढाल झाली.
तर पांढरा कांद्याच्या १० ट्रकमधून २१३४ पिशव्यांची आवक झाली आहे. कर्नाटक राज्यातून पांढरा कांदा येत आहे. या कांद्याला ३२०० रुपये कमाल, तर १५०० रुपये सर्वसाधारण दर मिळत असल्याचे बाजार समितीने सांगितले.
ग्रामीण भागात कांद्याची लागवडसध्या ग्रामीण भागात वाफसा आल्याने कांद्याची लागवड सुरू झाली आहे. एकीकडे अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना दुसरीकडे शेतात रब्बी पिकांचा हंगाम सुरू झाला आहे. सध्या शेतात कांद्याची, उसाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
अधिक वाचा: १० वर्षांपासून डाळिंबाची युरोपला निर्यात; बिदालचा 'हा' शेतकरी एका हंगामात घेतोय ९५ लाखांचे उत्पन्न
Web Summary : Solapur market witnessed 191 onion trucks. Prices ranged from ₹100 to ₹2250 per quintal. Arrivals increased from Pune, and Karnataka. Old onions dominated sales, totaling ₹1.9 crore. White onion fetched ₹3200/quintal. Rural areas begin onion planting despite flood damage.
Web Summary : सोलापुर मंडी में 191 प्याज ट्रक पहुंचे। कीमतें ₹100 से ₹2250 प्रति क्विंटल तक रहीं। पुणे और कर्नाटक से आवक बढ़ी। पुराने प्याज की बिक्री ₹1.9 करोड़ रही। सफेद प्याज ₹3200/क्विंटल बिका। बाढ़ के नुकसान के बावजूद ग्रामीण इलाकों में प्याज की रोपाई शुरू।