चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये पितृपंधरवड्यामुळे हिरवी मिरची, फरशी, काकडी, डांगर भोपळा, चवळी, वालवड आणि गवारीची प्रचंड आवक झाली.
पालेभाज्यांची भरपूर आवक होऊनही भाव कडाडले आहेत, तर लसणाची आवक कमी झाली तरी भाव स्थिर राहिले. बाजारात एकूण ४ कोटी ३५ लाख रुपयांची उलाढाल झाली.
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,२५० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत २५० क्विंटलने जास्त आहे. यामुळे कांद्याच्या कमाल भावात २०० रुपयांची घट होऊन तो १,७०० वरून १,५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावला.
कांद्याचे भाव
क्रमांक १) १,५०० रुपये.
क्रमांक २) १,३०० रुपये.
क्रमांक ३) ९०० रुपये.
बटाट्याची आवक २,००० क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० क्विंटलने जास्त आहे. यामुळे बटाट्याच्या कमाल भावातही २०० रुपयांची घट होऊन तो २,२०० वरून २,००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिरावला.
बटाट्याचे भाव
क्रमांक १) २,००० रुपये.
क्रमांक २) १,५०० रुपये.
क्रमांक ३) १,५०० रुपये.
लसणाची आवक घटली, भाव स्थिर
लसणाची आवक ३५ क्विंटल झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ क्विंटलने कमी आहे. तरीही लसणाचा कमाल भाव १०,००० रुपये प्रतिक्विंटलवर स्थिर राहिला. हिरव्या मिरचीची आवक ४७५ क्विंटल झाली असून, तिला १,५०० ते २,००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
अधिक वाचा: शेतरस्त्यांसाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' ह्या नव्या योजनेची घोषणा; कशी होणार कार्यवाही?