सोलापूर : येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बुधवारी १२६ कांद्याच्या गाड्यांची आवक झाली.
बुधवारी किमान १००, कमाल ३१२५ तर सर्वसाधारण दर १३५० असा मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. आवक घटल्याने भाव वाढल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बुधवारी २५ हजार ३५२ पिशव्यांत १२ हजार ६७६ क्विंटल कांद्यातून १ कोटी ७१ लाख १२ हजार ६०० रुपयांची उलाढाल झाली आहे.
सध्या बाजार समितीमध्ये पुणे, अहिल्यानगर, विजयपूर, धाराशिव, लातूर, चडचण, मंगळवेढा, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, इंदापूर या शहरातून कांदा विक्रीसाठी येत आहे.
नाशिक जिल्ह्यातील लासलगावनंतर सर्वाधिक कांदा लिलावासाठी राज्याच्या विविध भागातील व्यापारी सोलापुरात येतात.
अधिक वाचा: सोलापुरातील ओंकार आणि मातोश्री शुगर या कारखान्यांचे ऊस दर जाहीर; पहिली उचल किती देणार?
