चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली. बटाट्याची आवक स्थिर राहूनही भावात वाढ झाली.
हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडी आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने भावात वाढ झाली. जनावरांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ५ कोटी ४० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ३,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ९०० क्विंटलने कमी होऊनही कांद्याचे भाव १,३०० रुपयांवर स्थिरावले.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहून बटाट्याच्या कमाल भावात २,०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा भाव २,००० रुपयांवरुन २,२०० रुपयांवर पोहोचला.
लसणाची एकूण आवक १२ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक १७क्विंटलने घटूनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ३४५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमालाची आवक व बाजारभाव
कांदा
एकूण आवक - ३,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) १,३०० रुपये.
भाव क्रमांक २) १,१०० रुपये.
भाव क्रमांक ३) ८०० रुपये.
बटाटा
एकूण आवक - १,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,२०० रुपये.
भाव क्रमांक २) १,८०० रुपये.
अधिक वाचा: खते, बियाणे व कीटकनाशके कुठून खरेदी कराल? काय काळजी घ्याल? वाचा सविस्तर