चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भाव स्थिर राहिले. तर बटाट्याची आवक वाढूनही भावात स्थिर राहिले.
टोमॅटो, गवार, वांगी, कोबी, फ्लॉवरची आवक आणि भाव घसरले. पालेभाज्यांची भरपूर आतक आणि भाव गडगडले. जनावरांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल ५ कोटी २० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ६,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५,५०० क्विंटलने कमी होऊनही कांद्याचा कमाल भाव १,४०० रुपयांवर स्थिरावला.
बटाट्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २५० क्विंटलने वाढूनही बटाट्याचा कमाल भाव २,००० रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक २० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने कमी होऊनही लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.
हिरव्या मिरचीची एकूण आवक ४०० क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला २ हजार रुपयांपासून ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
शेतीमाल आवक व बाजारभाव
कांदा
एकूण आवक ६,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) १,४०० रुपये
भाव क्रमांक २) १,२०० रुपये
भाव क्रमांक ३) ८०० रुपये
बटाटा
एकूण आवक १,५०० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,००० रुपये
भाव क्रमांक २) १,५०० रुपये
भाव क्रमांक ३) १,३०० रुपये
अधिक वाचा: Pik Vima : विमा कंपन्यांसाठी शासनाचे नवे निकष; आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही पिक विमा