Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर?

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर?

Kanda Bajar Bhav : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did the prices stay? | Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर?

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर?

चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली.

चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली.

शेअर :

Join us
Join usNext

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये शेवगा, डांगर भोपळा, फ्लॉवर व बटाट्याचे भाव तेजीत राहिले आहेत.

चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,००० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५०० क्विंटलने घटूनही कांद्याचा कमाल २,००० रुपयांवर स्थिरावला.

बटाट्याची एकूण आवक १,७५० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही बटाट्याच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २,१०० रुपयांवरून २,२०० रुपयांवर पोहोचला.

लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीने घटल्याने लसणाचा कमाल भाव १० हजार रुपयांवर स्थिरावला.

हिरव्या मिरचीची एकूण आवक २९२ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार ५०० रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

आवक व बाजारभाव
कांदा

एकूण आवक १,००० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,००० रुपये.
भाव क्रमांक २) १,५०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,००० रुपये.

बटाटा
एकूण आवक १,७५० क्विंटल.
भाव क्रमांक १) २,२०० रुपये.
भाव क्रमांक २) १,८०० रुपये.
भाव क्रमांक ३) १,५०० रुपये.

अधिक वाचा: शेतजमिनीच्या वाटणीवरून होणारे वाद होणार कमी; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा नवा निर्णय

Web Title: Kanda Bajar Bhav : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did the prices stay?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.