Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav : Large arrival of onions in Otur Market Committee; How did you get the price? | Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; कसा मिळाला दर?

Kanda Bajar Bhav : ओतूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक; कसा मिळाला दर?

kanda bajar bhav जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारानिमित्त कांद्याची ११५० तर बटाटा ३९ पिशव्यांची आवक झाली आहे.

kanda bajar bhav जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारानिमित्त कांद्याची ११५० तर बटाटा ३९ पिशव्यांची आवक झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी बाजारानिमित्त कांद्याची ११५० तर बटाटा ३९ पिशव्यांची आवक झाली आहे.

अशी माहिती जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रीतम काळे व ओतूर उपबाजारचे व्यवस्थापक सतीश मस्करे यांनी दिली.

ओतूर उपबाजारात कधी वाढ तर कधी स्थिरता पाहायला मिळत आहे गुरुवार, दि. ३ जुलै २०२५ रोजी ओतूर उपबाजारात मागील रविवारपेक्षा कांद्याच्या भावात स्थिरता पाहायला मिळाली.

बाजारभावात वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्याला होती. सध्या कांद्याच्या बाजारभावात शेतकऱ्याचे भांडवल देखील फिटत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.

सध्या होणाऱ्या पावसामुळे व दमट हवामानामुळे कांदे खराब होण्याचे प्रमाण वाढले असून, शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे भाववाढ कधी होणार? आणि कांदा चाळीतील कांदा कधी विकणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१० किलोचे कांदा बाजारभाव
◼️ गोळे कांदा - १७० ते २००
◼️ सुपर कांदा - १३० ते १८०
◼️ नंबर २ गोल्टी/गोल्टा कांदा - ६० ते १४०
◼️ नंबर ३ कांदा बदला - २० ते १००

अधिक वाचा: आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न

Web Title: Kanda Bajar Bhav : Large arrival of onions in Otur Market Committee; How did you get the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.