दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगावला नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ४२०० रुपये, तर उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
तर दौंडला पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव स्थिर होते. दरम्यान, दौंड, केडगाव, यवत, पाटस येथे भुसार मालाची आवक घटल्याने बाजारभाव स्थिर निघाले. उपबाजार केडगावला कांद्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले.
दौंड येथील मुख्य आवारात कोबी, वांगी, काकडी, भेंडी, दोडका, कारली, शिमला मिरची, फ्लॉवर, हिरवी मिरची, भोपळा, गवार, घेवडा, बीट व आद्रकची आवक स्थिरावल्यामुळे बाजारभाव स्थिर निघाले.
शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान
दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार केडगावला नवीन ज्वारीची आवक सुरू झाली आहे. ४२०० रुपये, तर उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
दौंड येथील शेतमाल आवक (कंसात क्विंटलप्रमाणे)
दौंड मुख्य आवार
गहू (एफएक्यू) (८६) २५५० ते ३२००, ज्वारी (२) २२१० ते २२१०, बाजरी (१७) २०५० ते ३०५०.
उपबाजार केडगाव
गहू (एचएफक्यू) (३७४) २७०० ते ३६००, ज्वारी (३७३) २१०० ते ४३००, बाजरी (१६५) २४०० ते ३३००, हरभरा (४४) ४४०० ते ५९००, मका (४२) १९५० ते २२५०, मूग (४०) ५००० ते ७२००, तूर (६६) ६००० ते ६५८०.
उपबाजार पाटस
गहू (एचएफक्यू) (१६) २४०० ते ३३५०, ज्वारी (३) बाजरी (११) २६५० ते २९००, तूर (२) ६२०० ते ६२००.