Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर

किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर

It fetches a whopping price of Rs 7,000 per kilo; This is the world's most expensive date | किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर

किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर

most expensive dates in world रमजान महिन्यात इफ्तारीला खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या खजुराच्या विक्रीत वाढ झाली आहे.

most expensive dates in world रमजान महिन्यात इफ्तारीला खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या खजुराच्या विक्रीत वाढ झाली आहे.

खलील गिरकर
मुंबई: रमजान महिन्यात इफ्तारीला खजूर खाऊन रोजा सोडण्याची परंपरा आहे. त्यामुळे सध्या खजुराच्या विक्रीत वाढ झाली आहे.

मुंबईतीलबाजारांत सौदी अरेबिया, जॉर्डनसहित अरब राष्ट्रांमधून मोठ्या प्रमाणात खजूर व सुकामेवा आला आहे.

त्यापैकी अजवा खजूर अडीच हजार ते पाच हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. मेडजूल हा जॉर्डनमधून येणारा खजूर सर्वांत मोठ्या आकाराचा असून, त्याचा दर सहा ते सात हजार रुपये किलो आहे.

रमजानच्या निमित्ताने सुकामेवा व विविध प्रकारच्या खजुरांनी बाजारपेठा सजल्या आहेत. कलमी खजूर ९०० ते एक हजार ३०० रुपयांपर्यंत विकला जात असून, सध्या खजूर स्टफिंगची मोठी विक्री होत आहे.

यामध्ये खजुराची बी काढून त्यामध्ये ड्रायफ्रूट किंवा चॉकलेट भरून 'खजूर चॉकलेट' विकले जात आहे. हा नवीन प्रकार ट्रेडिंगमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. सुकरी खजुरालादेखील मोठी मागणी आहे.

सुकामेव्याला वाढती पसंती
◼️ ईदच्या वेळी 'शीर-खुरमा' बनविण्यासाठी सुकामेवा वापरला जातो. त्यामुळे त्याची मागणी वाढ झाली आहे.
◼️ पाइन नट्सचा दर सहा हजार ते साडेसात हजार रुपये किलो आहे.
◼️ पिस्ता दोन हजार ७०० रुपये किलो आहे.
◼️ इराणचा पांढरा अंजीर साडेतीन हजार रुपये किलो आहे.
◼️ केरळातील काजूमध्ये गोडवा जास्त असल्याने कोकणातील काजूऐवजी त्याला जास्त मागणी आहे.
◼️ काजू एक हजार २०० ते दीड हजार रुपये किलोदरम्यान मिळत आहे.
◼️ बदाम एक हजार २०० ते तीन हजार रुपये किलो दराने विकले जात आहेत.
◼️ अक्रोडचा दर दोन हजार रुपये किलो आहे.

रमजानमध्ये खजुराची वर्षातील सर्वाधिक जास्त विक्री होते. आरोग्यासाठी गुणकारी असल्याने रमजानव्यतिरिक्तही त्यांची चांगली विक्री होत असते. याशिवाय सुकामेव्याची विक्री रमजानच्या शेवटच्या आठवड्यात वाढते. - सलमान शेख, विक्रेते

अधिक वाचा: कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा घडविला इतिहास; केला 'हा' सर्वाधिक मोठा विक्रम

Web Title : रमज़ान में दुनिया का सबसे महंगा खजूर ₹7,000/kg में बिका।

Web Summary : रमज़ान में खजूर की बिक्री बढ़ी, खासकर अजवा (₹5,000/kg) और मेडजूल (₹7,000/kg)। 'शीर-खुरमा' के लिए पिस्ता (₹2,700/kg) और काजू जैसे सूखे मेवे भी लोकप्रिय हैं। खजूर स्टफिंग एक नया चलन है। सुकरी खजूर की भी भारी मांग है।

Web Title : World's most expensive date fetches ₹7,000/kg during Ramadan.

Web Summary : Ramadan sees surge in date sales, especially Ajwa (₹5,000/kg) and Medjool (₹7,000/kg). Dry fruits like pistachios (₹2,700/kg) and cashews are also popular for 'Sheer-khurma'. Date stuffing is a new trend. Sukari dates see high demand too.