Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > ओतूर बाजार समितीत हिरव्या वाटण्याच्या शेंगा तेजीत; कसा मिळतोय दर?

ओतूर बाजार समितीत हिरव्या वाटण्याच्या शेंगा तेजीत; कसा मिळतोय दर?

Increase the market price of green peas in Otur Market Committee; How are you getting the price? | ओतूर बाजार समितीत हिरव्या वाटण्याच्या शेंगा तेजीत; कसा मिळतोय दर?

ओतूर बाजार समितीत हिरव्या वाटण्याच्या शेंगा तेजीत; कसा मिळतोय दर?

vatana bajar bhav गेल्या १५ दिवसात सतत झालेल्या पावसामुळे भाजीपाला लोकांना काढता आला नाही, त्यामुळे पुरवठा कमी झाला आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

vatana bajar bhav गेल्या १५ दिवसात सतत झालेल्या पावसामुळे भाजीपाला लोकांना काढता आला नाही, त्यामुळे पुरवठा कमी झाला आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

ओतूर : गेल्या १५ दिवसात सतत झालेल्या पावसामुळे भाजीपाला लोकांना काढता आला नाही, त्यामुळे पुरवठा कमी झाला आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.

ओतूरला गुरुवारी आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर वाढलेले दिसले. वाटाणा सध्या २०० रुपये किलो दराने विकला जात होता, तर २० ते २५ रुपये किलोने मिळणारा टोमॅटो ४० ते ५० रुपयाचा भात खात आहे.

कोथिंबीरची ४० ते ६० रुपयांना मिळणारी जुडी १० ते २० रुपयांवर खाली आली आहे. मेथीची जुडी ३० रुपयांना मिळत आहे.

ऋतुबदलामुळे भाजीपाल्यांच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत.

भाज्यांचे दर प्रतिकिलो रुपयांत
वाटाणे २०० रुपये, काकडी ४० रुपये, मिरची ६० रुपये, भेंडी ५० किलो, वाल १०० रुपये, घेवडा १०० रूपये, वांगी ४० रुपये पावशेर, गाजर ८० रुपये, गवार ८० रुपये, टोमॅटो ५० रुपये, भेंडी ८० किलोप्रमाणे विक्री झाली, तर पालक २० रुपये एक जुडी, शेपू १५ रुपये, कोथिंबीर १० रुपये, ४० मेथी रुपये जुडी असे बाजारपेठेत भाव दिसून आले.

ओल्या भुईमूग शेंगांनी शतक ओलांडले
बाजारपेठेमध्ये ओली भुईमूग शेंग ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे विकली जात असून, तीच शेंग किरकोळ विक्रेत्याकडे ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. ठोक भावामध्ये नसले तरी किरकोळ भावामध्ये भुईमूग शेंगाने शतक ओलांडले आहे.

अधिक वाचा: सांगली व कोल्हापूरच्या तुलनेत गुजरातमध्ये उसाला मिळतोय कसा दर; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Increase the market price of green peas in Otur Market Committee; How are you getting the price?