Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?

आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?

Impact of war on mango market; Read: What is the price being paid for a box of five dozen? | आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?

आंबा बाजारावर युद्धाचा परिणाम; वाचा पाच डझनच्या पेटीसाठी काय मिळतोय दर?

Mango Market इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतील आंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.

Mango Market इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतील आंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.

इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अनिश्चितता वाढली असली, तरी मुंबईतील आंबा बाजारावर त्याचा थेट मोठा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.

मात्र, वाहतूक खर्च, इंधनदर आणि निर्यात व्यवहारांवर होणाऱ्या संभाव्य परिणामामुळे व्यापाऱ्यांमध्ये सावध भूमिका दिसून येत आहे.

कोकण पट्ट्यातून मुंबईत हापूस आंब्याची आवक सध्या सर्वसाधारण आहे. हंगामाच्या सुरुवातीला थोडी घट जाणवली होती, मात्र या आठवड्यात आवक वाढल्याने बाजारात स्थिरता आहे.

वाशी एपीएमसी मार्केट आणि भायखळा मार्केट येथे दररोज मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. रत्नागिरी, देवगड तसेच दक्षिणेतून आंब्याची आवक वाढली आहे.

याचे कारण सध्या आखाती देशात निर्यात बंद असल्याने मुंबईत सर्व जातीचे आंबे येत आहेत, असे मुंबईतील आंबा व्यापारी जय गुप्ता यांनी सांगितले.

पाच डझनच्या पेटीसाठी पाच हजार रुपये
◼️ दर्जानुसार हापूस आंब्याचे दर ४-५ डझनच्या पेटीसाठी साधारण ४,००० ते ५,००० रुपयांदरम्यान आहेत.
◼️ उच्च प्रतीच्या देवगड आणि रत्नागिरी हापूससाठी ग्राहकांना ५,०००-६,००० दर मिळतो आहे.
◼️ रत्नागिरी पिंजरा, पायरी आणि मध्यम प्रतीच्या आंब्यांचे दर ३,५००-४,००० रुपयांपर्यंत (पेटी) आहेत, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा: आता बँक खातेही एका बँकेतून दुसऱ्या बँकेत 'पोर्ट' करणे शक्य होणार; जाणून घ्या सविस्तर

Web Title : युद्ध का आम बाज़ार पर असर: पाँच दर्जन का क्या है दाम?

Web Summary : अंतर्राष्ट्रीय तनाव के बावजूद, मुंबई का आम बाज़ार स्थिर है। रत्नागिरी और देवगढ़ से आपूर्ति बढ़ने से निर्यात व्यवधानों की भरपाई हो रही है, जिससे पाँच दर्जन उच्च गुणवत्ता वाले अल्फांसो आमों की कीमत ₹4,000-₹6,000 के बीच है। व्यापारी परिवहन लागत और ईंधन की कीमतों पर सावधानीपूर्वक निगरानी रख रहे हैं।

Web Title : War's Impact on Mango Market: Price for Five Dozen Revealed

Web Summary : Despite international tensions, Mumbai's mango market remains stable. Increased supply from Ratnagiri and Devgad offsets export disruptions, keeping prices between ₹4,000-₹6,000 for five dozen high-quality Alphonso mangoes. Traders are cautiously monitoring transport costs and fuel prices.