कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर काढलेल्या सौद्यात गुळाला प्रतिक्विंटल ५०५० रुपये भाव मिळाला.
त्याचबरोबर यंदा भाजीपाला मार्केटमध्ये मुहूर्ताचा सौदा काढण्यात आला, यामध्ये कोथिंबीरला शेकडा २१०० रुपये भाव मिळाला. 'गोकुळ'चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते दोन्ही सौदे काढण्यात आले.
बाजार समितीत दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर सौदे काढले जातात. यंदा, अमर पाटील यांच्या अडत दुकानापासून बुधवारी सौद्याला सुरुवात झाली. यामध्ये प्रतिक्विंटल ३७०० ते ५०५० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला.
फळे-भाजीपाला मार्केटमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या संतोष ट्रेडिंग कंपनी दुकानात कोथिंबीरचा सौदा काढण्यात आला.
यावेळी 'बिद्री' साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, 'गोकुळ'चे संचालक प्रा. किसन चौगले, सभापती सूर्यकांत पाटील, संचालक भारत पाटील-भुयेकर, अॅड. प्रकाश देसाई, संभाजी पाटील-कुडित्रेकर उपस्थित होते.
तसेच सुयोग वाडकर, कुमार आहुजा, शंकर पाटील, पांडुरंग काशीद, बाळासाहेब पाटील, शेखर देसाई, दिलीप पोवार, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील यांच्यासह व्यापारी, अडते, शेतकरी उपस्थित होते.
कचरा उठावासाठी आता 'घंटागाडी'
बाजार समिती आवारातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी घेतली आहे. त्याचे पूजनही नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिक वाचा: राज्यात ऊस गाळपाची मोठी घाई; कारखान्यांनी पहिल्या उचलीचा आकडा जाहीर केल्यावरच उसाला कोयता
