मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या शेवगा, वाटाणा आणि गवार या शेतमालाचे बाजारभाव तेजीत आहेत. विशेषतः वाटाण्याने तब्बल ९० रुपये प्रतिकिलो असा विक्रमी भाव गाठला आहे.
बाजार समितीत एकूण १२,६०७ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. वाटाण्याला १० किलोला ६५० ते ९०० रुपये असा चांगला भाव मिळाला आहे.
सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, तरकारी शेतमालाची आवक वाढल्याने बाजारभावात ही वाढ झाली आहे.
मंचर बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर आणि शिरूर या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तरकारी विक्रीसाठी घेऊन येतात.
या बाजार समितीचे वैशिष्ट्य म्हणजे, शेतमालाचा लिलाव झाल्यानंतर शेतमालाचे वजन, बाजारभाव आणि एकूण रक्कम याची माहिती शेतकऱ्यांना मोबाइल अॅपद्वारे मिळते.
प्रमुख तरकारी शेतमालाचे बाजारभाव (प्रति १० किलो)
कारले (१८२ डाग): १३०-२४० रुपये.
गवार (१७३ डाग): ३९०-७३५ रुपये.
घेवडा (१४३ डाग): १५०-५०० रुपये.
चवळी (१५४ डाग): २५०-४६० रुपये.
ढोबळी मिरची (१६० डाग): २३०-४५० रुपये.
भेंडी (१८१ डाग): २६०-४५० रुपये.
फरशी (३२७ डाग): ३३५-६५१ रुपये.
फ्लॉवर (४,६५६ डाग): १०५-१७० रुपये.
भुईमूग शेंगा (३ डाग): ६०० रुपये.
दोडका (६५ डाग): १००-४०१ रुपये.
मिरची (३८६ डाग): ३६०-६५० रुपये.
तोंडली (१२ डाग): १००-४११ रुपये.
लिंबू (२२ डाग): ३५० रुपये.
काकडी (९७३ डाग): २०-१७० रुपये.
कोबी (१,०१९ डाग): १०-६० रुपये.
वांगी (८१ डाग): ३९५-७५० रुपये.
दुधी भोपळा (११७ डाग): १५०-३०० रुपये.
बीट (१,१५५ डाग): १००-२४५ रुपये.
आले (३९ डाग): १९०-५५० रुपये.
टोमॅटो (१३८ डाग): २४०-४५० रुपये.
अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर