श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात मोकळा कांदा लिलावासाठी १२० साधनातून आवक आली.
चांगल्या कांद्यास सर्वाधिक १२५० रुपये भाव मिळाला. लिलावात प्रथम श्रेणीचा कांदा १००० ते १२५०, द्वितीय ८०० ते ९७५, तृतीय २०० ते ७५० व गोल्टी ५०० ते ८५० रुपये प्रतिक्विंटल विकला.
मोकळा कांदा लिलाव पद्धतीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या पद्धतीमध्ये गोणी खर्च, मजुरी खर्च वाचून वेळ वाया जात नाही. कांदा उत्पादन एकरी बारा टन अपेक्षित धरल्यास पाच रुपये प्रतिकिलो प्रमाणे साठ हजार रुपये होतात.
एक एकर कांद्याचा उत्पादन खर्च एक लाख रुपये होत आहे. म्हणजेच प्रतिएकर ४० हजार रुपये तोटा कांदा उत्पादकांना सहन करावा लागत आहे.
शेतकरी सरकारच्या कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. शेतीत मजुरांचा प्रचंड तुटवडा असताना कांद्याचा मजुरी खर्चही देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.
प्लास्टिक बारदाना महागला
◼️ सुमारे ८० टक्के कांदा पीक काढून शेतात पोळी पडलेल्या आहेत.
◼️ अवकाळी पावसाच्या थैमानामुळे कांदा झाकण्यासाठी एकरी पंधरा हजार रुपये किमतीचा प्लास्टिक बारदाना लागत आहे.
◼️ प्लास्टिक बारदाण्याचे मार्केट प्रतिकिलो साठ ते सत्तर रुपये महाग झाले आहे.
अधिक वाचा: Monsoon Update : नैर्ऋत्य मान्सून येण्याची तारीख जाहीर; किती तारखेला दाखल होणार मान्सून?
