सोलापूर : श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल ३७०० रुपयाचा दर मिळाला होता.
आठवड्यातच दरात मोठी घसरण झाली असून, सुमारे एक हजार रुपये कमी मिळत आहे.
दर वाढल्याने जवळपास ५०० ट्रक कांद्याची आवक होत आहे. आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे.
गुरुवारी कमाल दर २८०० रुपये इतका राहिला. सरासरी दर १७०० वरून १००० रुपयांवर आलेला आहे.
जानेवारी महिन्यात आणखी आवक वाढणार आहे. त्यामुळे दर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
अधिक वाचा: दामाजी कारखान्याकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी ऊस दर जाहीर; पहिला हप्ता किती देणार?
