मंचर : पितृपंधरावड्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत तरकारीच्या बाजारभावात लक्षणीय वाढ झाली आहे.
फ्लॉवर आणि वाटाणा यांसारख्या शेतमालाचे भाव तेजीत असून, वाटाण्याचा भाव तब्बल १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.
रविवारी बाजार समितीत एकूण ११,५१८ डाग इतकी तरकारी शेतमालाची आवक झाली. यामध्ये फ्लॉवरला प्रति १० किलो १६० ते ३११ रुपये, तर वाटाण्याला ८८० ते १,०१० रुपये बाजारभाव मिळाला.
सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, पितृपंधरवड्यामुळे तरकारीला मागणी वाढली आहे, परंतु आवकेत घट झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. पुढील दहा दिवस बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.
तरकारी शेतमालाल बाजारभाव (कंसात आवक)
कारले (२६२ डाग) : २२०-४२० रुपये
गवार (३०१) : ५५०-१,००० रुपये
घेवडा (८८) : १५०-७०१ रुपये
चवळी (३००) : २८०-५३० रुपये
ढोबळी मिरची (१८०) : ३००-५५० रुपये
भेंडी (२९१) : २३०-४२० रुपये
फरशी (३५५) : १२०-६०१ रुपये
फ्लॉवर (३,४८४) : १६०-३११ रुपये
भुईमूग शेंगा (१) : ३४० रुपये
दोडका (७१) : २३५-४५१ रुपये
मिरची (२३९) : ३२०-६०० रुपये
तोंडली (१५) : १००-४५१ रुपये
लिंबू (९) : ४०० रुपये
काकडी (८०४) : ८५-१६० रुपये
कोबी (१,२५५) : २०-८० रुपये
वांगी (९४) : ३२५-६०० रुपये
दुधी भोपळा (१०७) : १६०-३०० रुपये
बीट (१,८०८) : १३०-२४० रुपये
बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता
सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, पितृपंधरवड्यामुळे तरकारीला मागणी वाढली आहे, परंतु आवकेत घट झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. पुढील दहा दिवस बाजारभाव तेजीत राहण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: राज्यात बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेस गती येणार; आता मजबूत रस्ते तयार होणार