पुणे : हिवाळ्यात थंडी जोरदार सुरू होताच सुकामेव्याला मार्केट यार्ड भुसार बाजारात मागणी वाढली आहे. बदाम, काजू, पिस्ता, आक्रोड, अंजीर, खारीक, बेदाणे यांसारख्या पोषक सुकामेव्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
शिवाय काही वस्तूंवरील जीएसटी कपातीमुळे दर काही रुपयांनी खाली आले आहेत. त्यामुळे थंडीत रोज मुठभर सुकामेवा खाऊन ऊर्जावान राहा असा सल्ला आरोग्यतज्ज्ञाकडून दिला जात आहे.
यंदा देशातही उत्पादन समाधानकारक झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. उत्पन्न वाढल्याने मागील वर्षाच्या तुलनेत ड्रायफ्रुट्सच्या भावात १५ ते २५ टक्क्यांनी घट झाली आहे.
स्वदेशी सुकामेव्याचे उत्पादनही भरघोस असल्याने सध्या सुकामेवा बाजारात स्वस्त झाल्याने मागणी वाढली आहे. घाऊक तसेच किरकोळ बाजारात बदाम, जर्दाळू, मनुके, पिस्ता, काजू, डिंक यांना मागणी वाढली आहे.
थंडीत आरोग्यासाठी सुकामेवा फायदेशीर
◼️ ग्राहकांचा थंडीत सुकामेवा खरेदीकडे ओढा वाढला असून लहान मुलांना डब्याला सुकामेवा देण्यास प्राधान्य दिले जात आहे.
◼️ त्याचबरोबर यंदा दर कमी असूनही गुणवत्ता चांगली आहे.
◼️ त्यामुळे खोबरे, डिंक, मेथी, खारीक आदीपासून तयार होणाऱ्या घरगुती लाडूंना हिवाळ्यात मोठी मागणी आहे.
◼️ हे पदार्थ बनविताना काजू, बदाम, पिस्ते, खारीक, खोबरे यांचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे.
◼️ दर स्थिर मात्र थंडीत बदाम ५० रुपयांनी महाग झाला आहे. थंडीच्या दिवसात बदामाला मागणी असते.
◼️ काही नागरिक रोज रात्री बदाम भिजवून सकाळ लवकर उठून खात असतात.
◼️ त्यामुळे यंदा मात्र जोरदार थंडी सुरू असल्याने बदामाच्या दरात मात्र ५० रुपयांनी वाढ झाली आहे
असे आहेत सध्याचे दर
बदाम - ८५० ते १०००
काजू - ८५० ते १२००
बेदाणा - ४०० ते ५००
काळे मनुके - ४०० ते ६००
आक्रोड - १२०० ते १८००
पिस्ता - १२०० ते १५००
जर्दाळू - ३०० ते ६००
खजूर - १२० ते २००
आरोग्याच्या दृष्टीने उपयोगी असल्याने नागरिकांचा कल सुकामेव्याकडे अधिक वाढला आहे. सुकामेव्याची मागणी झपाट्याने वाढली असल्याने विशेषतः घरगुती डिंकाचे लाडू, पौष्टिक पदार्थ तयार करण्यासाठी खारीक, डिंक, खोबरे यांची जोरदार खरेदी होते. - नवीन गोयल, सुकामेवा व्यापारी, मार्केट यार्ड
अधिक वाचा: आता रेशनवर पुन्हा मिळणार साखर; राज्यातील 'या' रेशन कार्डधारकांना दीड वर्षानंतर साखरेचा लाभ
