बाजारदर घसरल्याने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात विविध भागत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन होत आहे. आगामी काळात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी केली. मात्र, उन्हाळी (गावठी) कांद्याचे दर गेल्या महिनाभरात घसरून अवघे ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत.
तर अशा स्थितीत शासनाकडून भाववाढीचे प्रयत्न व्हायला हवेत, परंतु उलट नाफेड व एनसीसीएफचा कांदाबाजारात विक्रीस काढल्याने दर आणखी कोसळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहे. दरम्यान आज रविवार असल्याने अनेक बाजारात लिलाव बंद होते.
तर कांदा खरेदी पार पडलेल्या राज्याच्या विविध बाजारात आज रविवार (दि.२१) सप्टेंबर रोजी एकूण २८३१९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७४४४ क्विंटल चिंचवड, १३०५७ क्विंटल लोकल, ७५१८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.
राज्याच्या कांदा बाजारात आज सर्वाधिक आवक असलेल्या लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे कमीत कमी ३०० तर सरासरी ९०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच पुणे-पिंपरी येथे १३५०, पुणे-मोशी येथे १०००, वाई येथे १५०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.
उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात कमीत कमी २०० तर सरासरी १००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच अकोले येथे १०५१, रामटेक येथे १२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. याशिवाय पुणे जिल्ह्यच्या जुन्नर-आळेफाटा बाजारात चिंचवड वाणाच्या कांद्याला आज कमीत कमी ९०० तर सरासरी १३०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच सातारा येथे आज कांद्याला कमीत १००० तर सरासरी १५०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला.
कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
21/09/2025 | ||||||
सातारा | --- | क्विंटल | 300 | 1000 | 2000 | 1500 |
जुन्नर -आळेफाटा | चिंचवड | क्विंटल | 7444 | 900 | 1510 | 1300 |
पुणे | लोकल | क्विंटल | 12195 | 300 | 1500 | 900 |
पुणे -पिंपरी | लोकल | क्विंटल | 17 | 1200 | 1500 | 1350 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 830 | 500 | 1500 | 1000 |
वाई | लोकल | क्विंटल | 15 | 1000 | 1800 | 1500 |
अकोले | उन्हाळी | क्विंटल | 1595 | 150 | 1400 | 1051 |
पारनेर | उन्हाळी | क्विंटल | 5885 | 200 | 1700 | 1000 |
रामटेक | उन्हाळी | क्विंटल | 38 | 1000 | 1500 | 1200 |