Lokmat Agro >बाजारहाट > Dharmabad Red Chilli: धर्माबादच्या लाल मिरचीचा तोरा पोहोचला सातासमुद्रापार वाचा सविस्तर

Dharmabad Red Chilli: धर्माबादच्या लाल मिरचीचा तोरा पोहोचला सातासमुद्रापार वाचा सविस्तर

Dharmabad Red Chilli: Dharmabad's red chilli harvest reaches seven continents Read in detail | Dharmabad Red Chilli: धर्माबादच्या लाल मिरचीचा तोरा पोहोचला सातासमुद्रापार वाचा सविस्तर

Dharmabad Red Chilli: धर्माबादच्या लाल मिरचीचा तोरा पोहोचला सातासमुद्रापार वाचा सविस्तर

Dharmabad Red Chilli : तेलंगणा (Telangana) राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद शहराचे नाव देशभरातील विविध राज्यांसह आता विदेशातही चर्चेत आले आहे. धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. (Dharmabad Red Chilli)

Dharmabad Red Chilli : तेलंगणा (Telangana) राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद शहराचे नाव देशभरातील विविध राज्यांसह आता विदेशातही चर्चेत आले आहे. धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. (Dharmabad Red Chilli)

शेअर :

Join us
Join usNext

लक्ष्मण तुरेराव

धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता विदेशात जात आहे. त्यामुळे शहराचे नाव सातासमुद्रापलीकडे गेले आहे. धर्माबादची मिरची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. बाजार समिती आवारात लाखो रुपयांची मिरचीची आर्थिक उलाढाल होते.(Dharmabad Red Chilli)

तालुक्यात मिरची लागवडीचे क्षेत्र कमी असले, तरी लगतच्या तेलंगणा (Telangana), आंध्र प्रदेश व कर्नाटक (Karnatak) राज्यातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीत होते.

या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक) (Karnatak), सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरून मिरचीची आवक (Chilli Arrivals) होते.

ग्राहक देखील मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात. धर्माबादेत गावरान आणि तेजा या प्रसिद्ध मिरची असून, त्यांना अधिक मागणी असते.

या व्यतिरिक्त गुंटुर, सी-फाइव्ह, टु सेवन्टी थ्री, वंडरहाट, रेशमपट्टा, कश्मिरी डब्बी, लवंगी, टमाटा शिमला, आरमूर, सिंजडा, थ्री फोर वन, ब्याडगी, कोल्हापुरी या विविध नमुने नावाची लाल मिरची येथे आवक होते.

यानंतर धर्माबाद शहरातच लाल मिरचीची पावडर तयार करून महाराष्ट्र, कर्नाटक (Karnatak), आंध्र प्रदेश, तेलंगणा (Telangana) राज्यासह विदेशातही पाठवली जाते.

१०० ते १६० रुपये किलो आहेत मिरचीचे यावर्षीचे दर येथील मिरची पावडर घेण्यासाठी तेलंगणातील निझामाबाद, हैद्राबाद, कामारेड्डी, म्हैसा, बोधन, साठापूर, नंदीपेट, बासरी, मुधोळ आदी परिसरातून व नांदेड जिल्ह्यातीलच नसून, महाराष्ट्रातील विविध तालुक्यांतील नागरिक, महिला धर्माबाद शहरात येतात.

मिरचीचे यावर्षीचे दर १०० ते १६० रुपये किलोप्रमाणे, तर मिरची पावडर २०० ते २५० रुपयांपर्यंत एक किलोप्रमाणे विकली जात आहे. गेल्या वर्षी पेक्षा यंदा मिरचीची आवक जास्त झाली असून, किमतीही कमी आहे.

मिरचीचे देठ काढण्याची मशीन येणार

मिरची खरेदी केल्यानंतर मिरची पावडर मोफत बनवून दिले जाते. त्याचे पैसे घेतले जात नाही, एवढेच नसून मीठ सुद्धा मोफत देतो, म्हणून येथे मिरची पावडर करून घेऊन जातात. हे मिरची पावडर देश-विदेशात पाठविण्यात येते.

आगामी काळात धर्माबाद शहरात मिरचीची देठ काढण्याची मशीन आणण्यात येणार आहे. मिरची ठेवण्यासाठी शहरात तीन शीतगृह उपलब्ध असून, तीन शीतगृहांचे काम सुरू आहे. - अमिरोद्दीन मिरचीवाले, औद्योगिक वसाहत केंद्राचे चेअरमन.

हे ही वाचा सविस्तर : Red Chilli Market: लाल मिरचीचा ठसका उतरला; जाणून घ्या काय आहे कारण

Web Title: Dharmabad Red Chilli: Dharmabad's red chilli harvest reaches seven continents Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.