Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव

कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव

Demand for hurda increases in severe cold; Price is fetching as much as Rs 400 per kg | कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव

कडाक्याच्या थंडीत हुरड्याच्या मागणीत वाढ; प्रतिकिलो मिळतोय तब्बल ४०० रुपयांचा भाव

hurda market थंडीची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक सुरू होते. मार्केटयार्डमध्ये हुरड्याची आवक सुरू होताच मागणीही वाढत आहे.

hurda market थंडीची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक सुरू होते. मार्केटयार्डमध्ये हुरड्याची आवक सुरू होताच मागणीही वाढत आहे.

पुणे : थंडीची चाहूल लागताच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक सुरू होते. मार्केट यार्डमध्ये हुरड्याची आवक सुरू होताच मागणीही वाढत आहे.

हंगामाच्या पहिल्या छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यातील टप्प्यात पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हुरडा विक्रीस पाठविला आहे.

हुरडा पार्टीचे आयोजन करणारे हॉटेल व्यावसायिक, पर्यटनस्थळी व गडकिल्ल्यावर हुरड्याच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे.

तसेच घरगुती ग्राहकांकडून हुरड्यांची खरेदी वाढली आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली.

सोलापूर संभाजीनगरमधून हुरड्याची आवक सुरू
◼️ साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू होतो. थंडी संपेपर्यंत हुरड्याला मागणी असते.
◼️ जानेवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात हुरड्याची आवक कमी होते.
◼️ हंगामाच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी हुरडा विक्रीस पाठवितात.
◼️ त्यानंतर डिसेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हुरडा विक्रीस पाठवितात.
◼️ छत्रपती संभाजीनगरमधून रोज १०० किलो हुरड्याची आवक होत असून किलोला ३५० ते ४०० रुपये दर मिळतोय.

हुरड्याची पाकिटे विक्रीस उपलब्ध
◼️ किरकोळ बाजारात गेल्या काही वर्षांपासून हुरड्याची तयार पाकिटे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
◼️ एका पाकिटात एक किलो हुरडा असतो.
◼️ सुरती आणि गुळभेंडी अशा प्रकारात हुरडा उपलब्ध आहे.
◼️ सध्या बाजारात सुरती हुरड्याची आवक होत आहे.
◼️ गुळभेंडी हुरडा चवीला गोड असतो, असे हुरडा व्यापारी माऊली सुपेकर आणि आंबेकर यांनी सांगितले.

अधिक वाचा: Ghonas Snake : विषारी घोणस, फुरसे ह्या सापांचा थंडीतच का वाढतो धोका? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Demand for hurda increases in severe cold; Price is fetching as much as Rs 400 per kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.