पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीला डाळिंबालापुणे मार्केट यार्डात डाळिंबाचे अडतदार संजय अनपट यांच्या गाळ्यावर उच्चांकी भाव मिळाला आहे.
अडत पेढी लिलावात उच्च दर्जाच्या डाळिंबाला ६३० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला आहे. यावेळी शेतकरी नवनाथ बजबळकर म्हणाले, की सध्या थंडीमुळे आणि हवामानातील बदलांमुळे डाळिंबाची आवक घटली आहे.
बाजारात जिथे पूर्वी ५०-६० टन आवक व्हायची, ती आता २५-३० टनांवर आली आहे. आवक कमी आणि गुणवत्ता उत्तम असल्यामुळे व्यापाऱ्यांनी या डाळिंबाला इतका मोठा दर दिला आहे.
कष्टकरी शेतकऱ्यांत या भाववाढीमुळे आनंदाचे वातावरण आहे. खरेदीदार ज्योतीराम शिंदे, राजाभाऊ जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन शेतकऱ्यांचा सत्कार केला.
अधिक वाचा: राज्यातील 'या' कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे राष्ट्रीयीकरण होणार; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
