Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > बेदाणा खातोय भाव; सोलापूर बाजार समिती एकाच दिवसांत २३५ टन बेदाण्याची विक्री

बेदाणा खातोय भाव; सोलापूर बाजार समिती एकाच दिवसांत २३५ टन बेदाण्याची विक्री

Currant prices are rising; Solapur Market Committee sells 235 tons of currants in a single day | बेदाणा खातोय भाव; सोलापूर बाजार समिती एकाच दिवसांत २३५ टन बेदाण्याची विक्री

बेदाणा खातोय भाव; सोलापूर बाजार समिती एकाच दिवसांत २३५ टन बेदाण्याची विक्री

सोलापूर जिल्हा बेदाणा उत्पादनात आणि कोल्ड स्टोअरेजच्या सुविधेमुळे एक मोठे केंद्र बनले आहे. येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी झालेल्या बेदाणा लिलावात समाधानकारक व्यवहार पाहायला मिळाले.

सोलापूर जिल्हा बेदाणा उत्पादनात आणि कोल्ड स्टोअरेजच्या सुविधेमुळे एक मोठे केंद्र बनले आहे. येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी झालेल्या बेदाणा लिलावात समाधानकारक व्यवहार पाहायला मिळाले.

सोलापूर जिल्हा बेदाणा उत्पादनात आणि कोल्ड स्टोअरेजच्या सुविधेमुळे एक मोठे केंद्र बनले आहे. येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (२३ एप्रिल २०२६) झालेल्या बेदाणा लिलावात समाधानकारक व्यवहार पाहायला मिळाले.

या लिलावात उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगाव येथील एका शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या बेदाण्याला ३७७ रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारी झालेल्या लिलावात बेदाण्याची मोठी आवक झाली होती.

एकूण ३८,२५० बॉक्स (सुमारे ३८२ टन) मालाची नोंद झाली. त्यापैकी २३,५१० बॉक्स (२३५ टन) मालाची विक्री झाली, तर १४,७४० बॉक्स (१४७ टन) माल अद्याप अनसोल्ड (विक्रीविना) राहिला आहे.

या लिलावातील सर्वात आकर्षण म्हणजे सोरेगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी नंदकुमार राठोड यांचा बेदाणा ठरला. त्यांच्या उत्कृष्ट प्रतीच्या ३४ बॉक्सला ३७७ रुपये असा सर्वाधिक दर मिळाला. व्ही. पी. हेले या अडत्याने हा माल विक्रीसाठी मांडला होता, तर आरती ट्रेडिंग कंपनीने हा माल खरेदी केला.

दर्जावर आधारित भाव

बेदाण्याचे दर हे प्रामुख्याने त्याच्या रंगावर (हिरवा, पिवळा, काळा), आकारावर आणि त्यातील ओलाव्यावर अवलंबून असतात. लांब आणि पिवळसर रंगाच्या बेदाण्याला नेहमीच अधिक मागणी असते.

अनेक शेतकरी दर कमी असल्यास माल कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यास पसंती देतात. उन्हाळ्याच्या दिवसात मिठाई आणि शीतपेयांमध्ये बेदाण्याचा वापर वाढतो, परिणामी बाजारपेठेत तेजी पाहायला मिळते.

सध्या सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होत आहे. यात सर्वाधिक फटका द्राक्षे, बेदाण्याला बसत आहे. यामुळे बाजारात बेदाण्याची आवक थोडी मंदावली आहे. सोलापुरात बेदाण्याला सर्वाधिक दर मिळत असल्याने अन्य जिल्ह्यातील माल सोलापुरात विक्रीसाठी येत आहे. - दिलीप माने, चेअरमन, बाजार समिती, सोलापूर.

बाजारभाव प्रति किलो

किमान दर - १४० रुपये
कमाल दर - ३७७ रुपये
सरासरी दर - २९० रुपये

हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर

Web Title : किशमिश के भाव में उछाल; सोलापुर बाजार में 235 टन की बिक्री।

Web Summary : सोलापुर बाजार में किशमिश के भाव ऊँचे, एक किसान को ₹377/किलो मिले। 382 टन की आवक में से 235 टन बिकी, बेमौसम बारिश से फसलें प्रभावित। गुणवत्ता से कीमत पर असर।

Web Title : Raisin prices soar; 235 tons sold in Solapur market.

Web Summary : Solapur market sees high raisin prices, with one farmer getting ₹377/kg. 235 tons sold from 382 tons arrival, despite unseasonal rains affecting crops. Quality impacts price.