मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गवार, वाटाणाचे बाजारभाव तेजीत आहेत. गवार १३० रुपये किलो तर वाटाणा ११० रुपये किलो या ठोक भावाने विकला गेला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी तरकारी शेतमालाची एकूण ११ हजार ३३३ डाग इतकी आवक झाली, गवार या शेतमालाला दहा किलोला ५००ते १३०० व वाटाणा या शेतमालाला दहा किलोला ७०१ ते ११०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
तरकारीच्या बाजारभावात काहीशी वाढ झाली आहे, अशी माहिती सभापती नीलेश थोरात यांनी दिली. मंचर बाजार समितीमध्ये तरकारी या शेतमालाला दहा किलोला खालीलप्रमाणे बाजारभाव मिळाला. कंसात मालाची आवक दर्शवली आहे.
दहा किलोप्रमाणे बाजारभाव
गवार (१५७) ५००-१३००
कारले (१८८) १३०-३५०
घेवडा (८८) १००-७००
चवळी (१८७) ३४०-६५१
ढोबळी मिरची (१०४) १५०-६००
भेंडी (२७४) २४५-४५२
फरशी (२४३) १००-५७०
फ्लॉवर (२९७३) ११०-२११
भुईमूग शेंगा (९) ४७०-५००
दोडका (६४) ३२०-५६०
मिरची (१९८) १००-६५१
तोंडली (३) ५००
लिंबू (७) ३५०
काकडी (७४७) १०५-२००
वांगी (८३) ३२५-६००
दुधी भोपळा (७३) १९०-३५०
बीट (३२०७) १४५-२७१
आले (४४) १००-५००
टोमॅटो (१५३) १९०-५५०
मका (४३३) ५०-१५०
पावटा (१५) ४११-६७५
वालवड (१८०) ५००-७७५,
बटाटा (४१) ५०-१७०
कोबी (११८४) ३०-१६०,
घोसाळी (११) १००-२५० या प्रमाणे शेतमालाला चांगला भाव मिळाला.
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर