Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर?

चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर?

Chambla's famous indigenous white onion has entered the market; What is the price being paid for a bunch of onions? | चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर?

चांबळ्याचा प्रसिद्ध देशी पांढरा कांदा बाजारात दाखल; एका कांद्याच्या माळेला काय मिळतोय दर?

white onion market दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे.

white onion market दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदा बाजारात दाखल झाला आहे.

दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस आतुरतेने वाट पाहिली जाते, असा औषधी गुणधर्म असलेला वाडा तालुक्यातील चांबळे येथील प्रसिद्ध पांढरा कांदाबाजारात दाखल झाला आहे.

दोन किलो वजनाची एक माळ १३० रुपयांना विकली जात आहे. अनेक संकटावर मात करत चांबळा गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पांढरा कांदा पिकविला आहे. भात कापणी झाल्यानंतर पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते.

वाड्यात चांबळे, डाकिवली, असनस, चिखला, गातेस, केळठण मोजक्याच गावांत पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. त्यानंतर तालुक्यात इतरही गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करू लागले आहेत.

यावर्षी तालुक्यात बऱ्यापैकी पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. यंदा नैसर्गिक संकटांवर मात करत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले आहे.

यंदा भावही चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कांदा काढल्यानंतर उन्हात दहा ते पंधरा दिवस सुकवला जातो. त्यानंतर घरी आणून मजुरांमार्फत त्याच्या माळा बांधल्या जातात.

तालुक्यातील प्रमुख मार्गालगत तसेच बाजारपेठात या कांद्याच्या माळा विक्रीसाठी आलेल्या दिसतात

वाड्यात कांद्याला पोषक वातावरण
◼️ पोषक वातावरण आणि पारंपरिक लागवड यामुळे आजही पांढरा कांदा आपले औषधी गुणधर्म टिकून आहे.
◼️ बाजारात या कांद्याला मोठी मागणी आहे आणि ती वाढतच आहे.
◼️ सध्या कांदा काढणी सुरू असून, तो सुकवून माळा तयार केल्या जात आहेत.

पांढऱ्या कांद्याचे औषधी गुणधर्म
◼️ अभ्यासकांच्या माहितीनुसार, पांढऱ्या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत.
◼️ कांद्यात मिथाईल सल्फाईड, अमिनो अ‍ॅसिड हे घटक असतात.
◼️ ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
◼️ पोटातील उष्णता कमी होण्यासाठी कांदा उपयुक्त ठरतो.
◼️ रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
◼️ जर सर्दी, कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस मध टाकून पिल्यास ही समस्या दूर होते.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरातील पांढऱ्या कांद्याला चांगला भाव मिळतो. मात्र आपल्याकडे उत्पादन खर्चाच्या मानाने भाव मिळत नाही, शासनाने पांढऱ्या कांद्याला अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - रवींद्र पाटील, उत्पादक शेतकरी, डाकिवली

अधिक वाचा: पुणे-बंगळुरू ग्रीनफिल्डसाठी २० हजार एकरचे भूसंपादन; महामार्गात कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश?

Web Title : प्रसिद्ध वाड़ा सफेद प्याज बाजार में; माला का क्या है दाम?

Web Summary : औषधीय गुणों वाला प्रसिद्ध वाड़ा सफेद प्याज बाज़ार में आ गया है। दो किलो की माला ₹130 में बिक रही है। किसानों ने चुनौतियों के बावजूद इसे उगाया। यह सीमित गांवों में उगाया जाता है लेकिन फैल रहा है। किसानों को प्याज सुखाने के बाद अच्छी कीमतों की उम्मीद है। इसमें औषधीय गुण हैं, जो कोलेस्ट्रॉल और पाचन में सहायक है।

Web Title : Famous Wada white onion arrives; what's the rate per garland?

Web Summary : The renowned medicinal Wada white onion has arrived. A two-kilo garland sells for ₹130. Farmers cultivated it despite challenges. It's grown in limited villages but spreading. Farmers hope for good prices after drying the onions. It possesses medicinal properties, aiding cholesterol and digestion.