Lokmat Agro >बाजारहाट > Bhusar Mal Bajar Bhav : लग्नसराईमुळे बाजारात भुसार मालाची आवक अन् विक्रीही वाढली

Bhusar Mal Bajar Bhav : लग्नसराईमुळे बाजारात भुसार मालाची आवक अन् विक्रीही वाढली

Bhusar Mal Bajar Bhav : Due to the wedding season, the arrival and sale of Bhusar Mal in the market has increased | Bhusar Mal Bajar Bhav : लग्नसराईमुळे बाजारात भुसार मालाची आवक अन् विक्रीही वाढली

Bhusar Mal Bajar Bhav : लग्नसराईमुळे बाजारात भुसार मालाची आवक अन् विक्रीही वाढली

३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.

३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

योगेश गुंड
केडगाव : ३० डिसेंबर ते ३० जानेवारीपर्यंत पौष महिना असल्याने तारखा असूनही लग्नकार्ये झाली नाहीत. मात्र, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मोठ्या तारखा असल्याने इकडे बाजारात विक्रीसाठी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा व इतर धान्यांची आवक वाढली आहे.

अहिल्यानगर बाजार समितीच्या भुसार विभागात दिवसाला सरासरी दीड हजार क्विंटल आवक होत आहे. मुला-मुलींच्या लग्नकार्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, तूर राखून ठेवले होते. मात्र, दर वाढला नाही.

मुला-मुलींचे लग्न तोंडावर आल्याने राखीव ठेवलेले सोयाबीन व इतर धान्य विक्रीला काढले जात आहे. त्यामुळेच बाजारात धान्याची आवक असल्याचे दिसत आहे.

२३ जानेवारीला अहिल्यानगरच्या बाजार समितीत १२६५ क्विंटल आवक होती. मागील महिन्यात एवढी मोठी आवक नव्हती; परंतु आता लग्नसराई येत असल्याने खरेदीला पैसा लागतो म्हणून सोयाबीन व इतर धान्य बेभावात विकावे लागत आहे.

अशी आहे शेतमालाची आवक व दर

शेतमालकिमान दरकमाल दरआवक
तूर६०००७१००७१५
हरभरा५६००६०००५३
मूग६४००७१००१०
उडीद५५००६५००८१
गहू२५००३३००४८
सोयाबीन३५५०४१००७१

तुरीची ७०० क्विंटल आवक
सध्या बाजारात तुरीची आवक बऱ्यापैकी आहे. अहिल्यानगर बाजार समितीत तुरीची ७०० ते ८०० क्विंटल आवक सुरू आहे. याला ६ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर आहे. तुरीचीही आवक बाजारात लग्नसराईमुळेच आहे.

अधिक वाचा: Tur Bajar Bhav : अक्कलकोट बाजार समितीत ३८ हजार क्विंटल तुरीची आवक; मिळतोय सर्वाधिक दर

Web Title: Bhusar Mal Bajar Bhav : Due to the wedding season, the arrival and sale of Bhusar Mal in the market has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.