Join us
Daily Top 2Weekly Top 5

केळीला पुन्हा सोन्याचे दिवस; दरात झपाट्याने वाढ, वाचा प्रतिक्विंटल काय मिळतोय दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:55 IST

keli niryat आखाती देशातील युद्धविरामामुळे ठप्प झालेली फळांची निर्यात सुरू झाली आहे. इंदापूरमधील केळीला बाजारपेठेत अक्षरशः सोन्याचे दिवस आल्याचे चित्र आहे.

इंदापूर : आखाती देशातील युद्धविरामामुळे ठप्प झालेली फळांची निर्यात सुरू झाली आहे. इंदापूरमधील केळीलाबाजारपेठेत अक्षरशः सोन्याचे दिवस आल्याचे चित्र आहे.

केळीला प्रतिकिलोस १८ रुपये उच्चांकी दर मिळत आहे. इराण-अमेरिका तणावामुळे केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.

युद्धविरामामुळे परिस्थितीत सकारात्मक बदल झाला. निर्यात पुन्हा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने स्थानिक बाजारातही त्याचा अनुकूल परिणाम दिसू लागला आहे.

केळीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. अवघ्या काही आठवड्यांत केळीचा प्रतिक्विंटल १४००-१५०० रुपये असणारा दर थेट १९००-२१०० रुपयांवर पोहोचला आहे.

या संदर्भात केळीचे व्यापारी अ‍ॅड. आकाश बसळे म्हणाले की, यापूर्वी युद्धजन्य परिस्थितीत खराब झालेल्या सुमारे पाच हजार कंटेनरमुळे व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.

युद्धविरामानंतर बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. परिस्थिती सुधारत आहे. केळीचा उठाव चांगला होत आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

आजच्या घडीला बाजारपेठेत केळीची आवक काहीशी घटली आहे, मात्र मागणी वाढल्याने दरात तेजी दिसून येत आहे.

ही स्थिती पुढील किमान महिनाभर टिकेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली. निर्यात सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य आले आहे.

अधिक वाचा: इतर झाडाच्या तुलनेत नारळाच्या झाडावरच का पडते वीज? जाणून घ्या ह्या मागचे लॉजिक

English
हिंदी सारांश
Web Title : Banana prices surge: Export resumption brings golden days for farmers.

Web Summary : Banana farmers in Indapur are experiencing a price surge due to resumed exports after a ceasefire in the Gulf. Prices jumped from ₹1400-1500 to ₹1900-2100 per quintal. Traders are optimistic, predicting stable prices for at least a month, benefiting farmers significantly.
टॅग्स :केळीबाजारमार्केट यार्डयुद्धशेतकरीशेतीइंदापूरइराणअमेरिका