Lokmat Agro >बाजारहाट > पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर?

पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर?

Arrival of sour and sweet ber has started in Pune Market Committee; How are you getting the price? | पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर?

पुणे बाजार समितीत आंबट आणि गोड बोरांची आवक सुरु; कसा मिळतोय दर?

आंबट गोड बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात बोरांची आवक सुरू झाली आहे.

आंबट गोड बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात बोरांची आवक सुरू झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे: आंबट गोड बोर म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा बोरांचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात बोरांची आवक सुरू झाली आहे.

बाजारात १० ते १५ पोत्यांची आवक होत आहे. तुरळक प्रमाणात होणारी आवक हळू-हळू आवक वाढत जाणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली.

यंदा १५ दिवस आधीच आवक सुरू झाली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत बोरांचा हंगाम सुरू राहणार आहे. सध्या शहर उपनगरांतील किरकोळ विक्रेत्यांकडून बोरांची खरेदी करण्यात येत आहे.

आवक वाढल्यानंतर महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळासह विविध पर्यटनस्थळातून मागणी वाढते. येथून परराज्यांतही माल जात असतो.

हंगामाच्या सुरुवातीला मिळालेला भाव मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहे. सोलापूर जिल्ह्यातून सर्वाधिक बोरांची आवक होत होत असून मोहोळ तालुक्यातील आष्टी भागातून झाली आहे.

बाजारात दाखल होणारा माल दर्जेदार असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. बोरांच्या खरेदीसाठी बाजारामध्ये प्रतिसाद मिळत आहे.

घाऊक बाजारातील बोरांचा दर्जानुसार १० किलोंचा भाव
बोरांचा प्रकार - १० किलोचे भाव (रुपयांमध्ये)

चमेली - २०० ते २५०
चेकनेट - ९००
चण्यामण्या - ७०० ते ७५०

अधिक वाचा: 'सोमेश्वर' कारखान्याची उच्चांकी उसदराची परंपरा कायम: किती दिला अंतिम ऊस दर?

Web Title: Arrival of sour and sweet ber has started in Pune Market Committee; How are you getting the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.