Lokmat Agro >बाजारहाट > नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर

नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर

About 90 trucks of fruits and vegetables arrived at Gultekdi from various parts of the state and other states for the Navratri festival; Read what is the price being offered | नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर

नवरात्रोत्सवासाठी गुलटेकडी येथे राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक; वाचा काय मिळतोय दर

Fruits Market Update : नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस अनेकांना उपवास असतात. त्यासाठी लागणाऱ्या फळामध्ये सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, मोसंबी आणि संत्रा आदी फळांना रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Fruits Market Update : नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस अनेकांना उपवास असतात. त्यासाठी लागणाऱ्या फळामध्ये सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, मोसंबी आणि संत्रा आदी फळांना रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवरात्रोत्सवास आजपासून सुरुवात होत आहे. नऊ दिवस अनेकांना उपवास असतात. त्यासाठी लागणाऱ्या फळामध्ये सफरचंद, डाळिंब, सीताफळ, पेरू, केळी, मोसंबी आणि संत्रा आदी फळांना रविवारी मार्केट यार्ड फळ बाजारात मागणी वाढल्याने आवकही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (दि. २१) बहुतांश सर्व फळांची आवक चांगली झाली आहे. सध्या सर्व प्रकारच्या फळांना मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने लिंबाच्या भावात गोणीमागे ५० ते ६० रुपये आणि सीताफळाच्या भावात दहा टक्के वाढ झाली होती.

गेल्या आठवड्यात सफरचंद, डाळिंबासह इतर सर्व प्रकारच्या फळांचे भाव-आवकही मागील आठवड्याच्या तुलनेत अधिक आहे. डाळिंब, सफरचंद शिवाय इतर फळांचे दर स्थिर होते असे घाऊक व्यापारी युवराज कांची यांनी सांगितले.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव

कोथिंबीर : ८०० ते १५००, मेथी : १२०० ते २०००, शेपू : ८०० ते १०००, कांदापात : ८०० ते २०००, चाकवत : ४०० ते ७००, करडई : ३०० ते ७००, पुदिना : ५०० ते १०००, अंबाडी : ३०० ते ७००, मुळे : ८०० ते १५००, चुका : ५०० ते ८००.

कोथिंबिरीची दीड लाख जुड्यांची आवक

पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात वाढली. त्यांची मागणी वाढली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीची १ लाख ५० हजार जुडी, तर मेथीची ३० हजार जुडी आवक झाली होती.

विविध फळांचे सध्याचे दर

लिंबू (प्रतिगोणी )३००-६०० रुपये 
मोसंबी (३ डझन)१३०-२८० रुपये
मोसंबी (४ डझन)४०-१२० रुपये
संत्रा (१०० किलो)८००-९०० रुपये
डाळिंब (प्रतिकिलोस)५०-१४० रुपये
कलिंगड८-१५ रुपये
खरबूज १५-४० रुपये
पपई १२-३० रुपये
चिकू (१० किलो)१००-५०० रुपये
पेरू (२० किलो)३००-४०० 
अननस (१ डझन)१००-६०० रुपये

आवकमध्ये सातारी आले

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो ८ ते १० हजार क्रेट, हिरवी मिरची १० ते १२ टेम्पो, काकडी ७-८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो आवक झाली.

भेंडी-घेवड्याच्या भावात वाढ

• गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी (दि. २१) भेंडी आणि घेवड्याच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गुलटेकडी येथील मार्केटयार्डात राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे २० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

• परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश हिरवी मिरची १५ टेम्पो, इंदोर येथून गाजर ६ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी १०० क्रेट इतकी आवक झाली होती.

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

Web Title: About 90 trucks of fruits and vegetables arrived at Gultekdi from various parts of the state and other states for the Navratri festival; Read what is the price being offered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.